Tiger 3 Movie
Tiger 3 Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 Movie: सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार 'टायगर ३' ची स्क्रिनिंग, या दिवसापासून सुरू होणार अ‍ॅडव्हान्स बुकिंग

Priya More

Tiger 3 Advance Booking:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या बहुप्रतीक्षित 'टायगर 3' चित्रपटामुळे (Tiger 3 Movie) चांगलाच चर्चेत आहे. यशराज फिल्म्सचा स्पाय यूनिव्हर्स चित्रपट 'टायगर ३' ची सलमान खानचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

या चित्रपटाची रिलीज डेट जवळ आली आहे त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढत चालली आहे. हा चित्रपट १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटाची नवी अपडेट म्हणजे या चित्रपटाचे स्क्रिनिंग सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

दिवाळीच्या खास मुहूर्तावर 'टायगर ३' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टायगर 3' चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका असलेला या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. चाहत्यांचा उत्साह लक्षात घेता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या स्क्रिनिंगबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सकाळी ७ वाजता या चित्रपटाचे पहिले स्क्रिनिंग सुरू होणार आहे. देशभरातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये सकाळी सात वाजता पहिला शो सुरू होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.

'टायगर ३' चित्रपटाचे भारतामध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग कधीपासून सुरू होणार याची माहिती ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली होती. टायगर 3' चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. आगाऊ बुकिंगवरूनच हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कलेक्शन करू शकतो याचा अंदाज येऊ शकतो. तर मागच्या आठवड्यापासून या चित्रपटाच्या तिकीटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅडव्हान्स बुकिंगला (Tiger 3 Advance Booking) सुरूवात झाली होती. या चित्रपटाच्या तिकीटाचे आतापर्यंत झालेल्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरून असा अंदाज लावला जात आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल.

टायगर ३ हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा ५ वा चित्रपट आहे. यशराज फिल्म्सने प्रेक्षकांच्या बजेटचा देखील विचार केला आहे. हा चित्रपट प्रेक्षक प्रत्येक फॉर्मटमध्ये पाहू शकणार आहेत. तु्म्ही हा चित्रपट अेक प्रीमियम फॉरमॅटमध्ये पाहू शकता. 2D, IMAX 2D, 4DX 2D, PVR P (XL), DBOX, आइस, 4DE मोशन या फॉरमॅटमध्ये तुम्हाला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट फक्त हिंदी नाही तर तमिळ आणि तेलुगू भाषेत देखील रिलीज होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT