Ranbir Kapoor Saam TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor: आलियाला सुद्धा आजवर 'ही' गोष्ट माहित नव्हती; रणबीरने स्वत: सांगितलं डेटींगचं सिक्रेट

Ranbir Kapoor On Dating: दोन यशस्वी अभिनेत्रींसोबतच्या रिलेशनशिपबद्दल त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. यावेळी त्याने अनेक खुलासे केले शिवाय त्याच्यावरील आरोपांवरीलही मोकळेपणाने भाष्य केले.

Rutuja Kadam

बॉलिवूडचा 'रॉकस्टार' अर्थात रणबीर कपूरचं खासगी आयुष्य नेहमीच प्रकाशझोतात राहिलं आहे. त्याने आजवर साकारलेल्या भूमिका लोकांनी डोक्यावर घेतल्या. तो बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय मानला जातो. त्यामुळे त्याची फॅनफॉलोईंग जास्त आहे. याच कारणाने त्याचे लव्ह-लाईफही कायमच चर्चेचा विषय राहिला आहे.

2022 मध्ये त्याने आलिया भट्टशी लग्न केलं. मात्र त्यापूर्वी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेले होतं. 'रिलेशनशिप' रणबीरच्या आयुष्यात कधीच छुप्या पद्धतीने राहिले नाही. आजही त्याबद्दल बोलले जाते. दोन यशस्वी अभिनेत्रींसोबतच्या रिलेशनशिपबद्दल त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. यावेळी त्याने अनेक खुलासे केले शिवाय त्याच्यावरील आरोपांवरीलही मोकळेपणाने भाष्य केले.

रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि चाहत्यांचा आवडता स्टार आहे. तो अनेकदा त्याच्या कामामुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या हा अभिनेता त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेचा भाग बनला आहे. या सिनेमासाठी तो खूप मेहनत घेत आहे. लूक, फिटनेस यासगळ्यावरच रणबीरने सिनेमासाठी प्रंचड काम केले आहे.

खरंतर, अभिनेता रणबीर कपूर लवकरच निखिल कामथच्या 'पीपल बाय डब्ल्यूटीएफ' पॉडकास्टमध्ये दिसणार आहे. अलीकडेच त्याने त्याचा एक छोटासा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रणबीर अनेक मुद्द्यांवर बोलतांना दिसत आहे. त्याच मुलाखतीत त्याने सांगितले की तो स्वतःला सहसा व्यक्त करत नाही आणि सहज रडत नाही. ''मी थेरपी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी थेरपीच्या विरोधात नाही. पण, मला स्वतःला इतरांसमोर व्यक्त होण्यात भीती वाटते.''

आलिया भट्टला डेट करण्यापूर्वी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. बॉलिवूडमधल्या दोन अभिनेत्रींसोबतचं अफेअर होतं. त्यामुळे त्याला वारंवार 'कॅसानोव्हा' आणि 'चीटर' अशी विशेषणं चिकटवली गेली. याचविषयीची खंत रणबीरने मुलाखतीदरम्यान बोलून दाखवली आहे. अर्थात त्याने मुलाखतीदरम्यान कुणाचेही नाव घेतले नाही. पण, ''मी दोन अतिशय यशस्वी अभिनेत्रींना डेट केले आणि तीच माझी ओळख बनली'', अशी खंत त्याने व्यक्त केली आहे.

रणबीरने दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींना डेट केले होते. ही अफेअर्स कधीच लपून राहिली नाहीत. डेट करत असताना त्यांचे फोटो कायमच समोर आले आणि सोशल मीडियावर ते प्रचंड व्हायरल झाले. दरम्यान, आलियासोबतही तो रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर 2022 मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले. या जोडप्याला आता 'राहा' नावाची गोंडस मुलगी आहे. इतर स्टारकिड्सप्रमाणे तिचीही सोशल मीडियात प्रचंड चर्चा असते. त्यामुळे राहाविषयीसुद्धा रणबीर मुलखतीत बोलला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT