Animal Movie  Animal Movie Leak- Saam Tv
मनोरंजन बातम्या

Animal Worldwide Collection: बॉक्स ऑफिसह जगभरात 'अ‍ॅनिमल'ची हवा , कमाईमध्ये 'पठान'-'जवान' आणि 'गदर २' चा मोडला रेकॉर्ड

Animal Movie Box Office Collection: या चित्रपटाची फक्त बॉक्स ऑफिसवर नाही तर जगभरात जादू पाहायला मिळत आहे. सात दिवसांत या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. दिवसेंदिवस हा चित्रपट एकापाठोपाठ एक रेकॉर्ड मोडत आहे.

Priya More

Animal Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओलचा (Bobey Deol) चित्रपट 'अ‍ॅनिमल'ची (Animal Movie) प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची फक्त बॉक्स ऑफिसवर (Box Office) नाही तर जगभरात जादू (Animal Worldwide Collection) पाहायला मिळत आहे. सात दिवसांत या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. दिवसेंदिवस हा चित्रपट एकापाठोपाठ एक रेकॉर्ड मोडत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 'जवान', 'पठान' आणि आता 'गदर २'चा देखील रेकॉर्ड मोडला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुरूवारी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने केलेल्या कमाईचे आकडे खूपच आश्चर्यकारक आहे. या चित्रपटाने सातव्या दिवशी बॉक्स ऑफिससह जगभरामध्ये तुफान कमाई करत इतिहास रचला आहे. या चित्रपटाने ५०० कोटींचा पल्ला कधीच पार केला आहे. 'अ‍ॅनिमल'ने सातव्या दिवशी वर्ल्डवाइड ५६३ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने 'जवान', 'पठान' आणि आता 'गदर २' चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

'अ‍ॅनिमल'च्या आतापर्यंतच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर , या चित्रपटाने सातव्या दवशी २५.५० कोटींची कमाई केली आहे. सहाव्या दिवशी या चित्रपटाने ३०.३९ कोटींची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी अ‍ॅनिमलने ३७.४७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी या चित्रपटाने ४३.९६ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७.८३ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ६६.२७ कोटींची कमाई केली. तर पहिल्या दिवशी ६३ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.

या चित्रपटाने वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे. सातव्या दिवशी या चित्रपटाने ५६३ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट हळूहळू एकएक टप्पो ओलांडताना दिसत आहे. दमदार ॲक्शन, उत्तम कथा, अफलातून व्हिएफएक्स आणि कलाकारांचा अभिनय असा मिलाप असलेल्या या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसह, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर आहेत. सर्वच कलाकारांच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चित्रपटाची निर्मिती जवळपास १०० कोटींमध्ये झालेली असून पहिल्या दोन दिवसांच्या कमाईतूनच निर्मितीचा खर्च वसूल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT