Ranbir Kapoor  Instagram
मनोरंजन बातम्या

Animal Worldwide Collection 6 Day: 'अ‍ॅनिमल'चा जगभरात धुमाकूळ, वर्ल्डवाइड कलेक्शन ५०० कोटींपार

Animal Box Office Collection 6 Day: रणबीर कपूर आणि बॉबी देओलचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहे. या चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसवर नाही तर जगभरामध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

Priya More

Animal Worldwide Collection:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओलचा (Bobey Deol) चित्रपट 'अ‍ॅनिमल'ची (Animal Movie) फक्त देशातच नाही तर जगभरामध्ये हवा आहे. या क्राइम थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओलचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहे. या चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसवर नाही तर जगभरामध्ये रेकॉर्डब्रेक (Animal Worldwide Collection) कमाई केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुधवारी या चित्रपटाने केलेल्या कमाईचे आकडे खूपच आश्चर्यकारक आहे. या चित्रपटाने सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिससह जगभरामध्ये तुफान कमाई करत इतिहास रचला आहे. या चित्रपटाने 500 कोटींचा पल्ला पार केला आहे. 'अ‍ॅनिमल'ने वर्ल्डवाइड ५२७ कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

'अ‍ॅनिमल'च्या आतापर्यंतच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर , सहाव्या दिवशी या चित्रपटाने जगभरामध्ये ५२७ कोटींची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी अ‍ॅनिमलने जगभरामध्ये ५६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी या चित्रपटाने ६९ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने वर्ल्डवाइड १२० कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाने १२० कोटींची कमाई केली. तर पहिल्या दिवशी ११६ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.

'अ‍ॅनिमल'ने रिलीजच्या सहाव्या दिवशी देशांतर्गत जबरदस्त कमाई करत इतिहास रचला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी ३० कोटींचा गल्ला जमवून ३०० कोटींचा आकडा पार केला आहे. देशातील सर्व भाषांमध्ये या चित्रपटाचे 6 दिवसांचे एकूण कलेक्शन ३१२.९६ कोटी झाले आहे. यासोबतच या चित्रपटाने 'टायगर 3' च्या लाइफटाईम कलेक्शनचा रेकॉर्डही मोडला आहे. 'टायगर 3' ने २८२.३० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने सहाव्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये 'जवान', 'पठाण' आणि 'बाहुबली 2'चा रेकॉर्डही मोडीत काढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार की कमी होणार? अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात किल्ला पहाण्यासाठी आलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू

अर्थसंकल्पाआधीच शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

SCROLL FOR NEXT