Alia-Ranbir Received Consecration Ceremony Of Ram Temple Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ram Mandir: राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमाचे आलिया-रणबीरला निमंत्रण, कोण-कोण सेलिब्रिटी लावणार हजेरी?

Alia-Ranbir Received Consecration Ceremony Of Ram Temple: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना स्वतंत्र आमंत्रण देण्यात आले आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.

Priya More

Ram Mandir Consecration Ceremony:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आले आहेत. आलिया आणि रणबीर त्यांच्या चित्रपट किंवा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले नाहीत. तर आलिया आणि रणबीर चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे त्यांना राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना स्वतंत्र आमंत्रण देण्यात आले आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम -

22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. या कार्यक्रमात नेत्यांपासून बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण सहभागी होणार आहेत. या यादीमध्ये आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. या कपलचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारताना दिसत आहेत.

रणबीर-आलियाचे फोटो व्हायरल -

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना आमंत्रित करताना दिसले. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. 22 जानेवारीला राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठान सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

या बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रण -

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमासाठी बॉलिवूडचे बिग बी अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचसोबत, अक्षय कुमार, कंगना रनौत, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, सनी देओल, अजय देवगण, आयुष्मान खुराना, मधुर भांडारकर, संजय लीला भन्साळी या बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे.

या टॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रण -

बॉलिवूडसोबत साऊथ सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना देखील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. साऊथचे सुपरस्टार रजनीकांत, प्रभास, केजीएफ स्टार यश, धनुष, चिरंजीवी, कांतारा दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनाही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.

7 हजार व्यक्ती राहणार उपस्थित -

22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील एकूण 7 हजार नामवंत व्यक्तींना निमंत्रण पत्र देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त लाखो व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राम मंदिर ट्रस्ट या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त आहे. देशभरातील राजकीय व्यक्तींनाही निमंत्रणपत्रे देण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT