Poonam Pandey Husband Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey: कानपूरची साधी मुलगी कशी बनली मुंबईची टॉप मॉडेल?, पूनम पांडेच्या लग्नाची झाली होती चर्चा

Poonam Pandey Life Journey: पूनम पांडेचा जन्म 11 मार्च रोजी कानपूरमध्ये झाला होता. परंतु मॉडेलिंगची आवड तिला मुंबईत घेऊन गेली. ती Gladrags Manhunt आणि Megamodel Contest द्वारे प्रसिद्धीच्या झोतात आली आणि फॅशन मॅग्झिनच्या कव्हर पेजवर झळकली.

Priya More

Poonam Pandey Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे (Poonam Pandey) निधन झाले आहे. पूनम पांडेचे गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. सोशल मीडियावर पूनम पांडेच्या निधनाची पोस्ट व्हायरल होत आहे. पूनमच्या निधनाचे वृत्त कळाताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पूनम पांडेचे निधन झाल्यावर कोणालाच विश्वास बसत नाही. पूनम पांडेच्या निधनामुळे बॉलिवूडचा मोठा धक्का बसला आहे. अशामध्ये कानपूरची ही एक साधी मुलगी मुंबईची हॉट मॉडेल कशी बनली?, तिच्या पर्सनल लाइफबद्दल आपण जाणून घेणार आहोत....

पूनम पांडेचा जन्म 11 मार्च रोजी कानपूरमध्ये झाला होता. परंतु मॉडेलिंगची आवड तिला मुंबईत घेऊन गेली. ती Gladrags Manhunt आणि Megamodel Contest द्वारे प्रसिद्धीच्या झोतात आली आणि फॅशन मॅग्झिनच्या कव्हर पेजवर झळकली. 'नशा' चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण तिला बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यात यश मिळाले नाही. पूनम पांडे ही सर्वात जास्त चर्चेत सोशल मीडियामुळे राहायची. आपले हॉट आणि बोल्ड व्हिडीओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करायची. या फोटो आणि व्हिडीओद्वारे ती सोशल मीडियावर खळबळ उडवून द्यायची. पूनम पांडे सर्वात जास्त सक्रीय इन्स्टाग्रामवर असायची. इन्स्टाग्रामवर तिचे १.२ मिलियन फॉलोअर्स होते.

पूनम पांडेने 1 सप्टेंबर 2020 ला तिच्या लाँग टाइम बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते. कोरोनामुळे तिने अतिशय साधेपणाने लग्न केले. या कपलने आपले लग्न गोपनीय ठेवले होते. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नानंतर अवघ्या 9 दिवसांनी गोव्यात हनिमूनच्या वेळी पूनम पांडेने पतीवर छळ, धमकी, मारहाण अशाप्रकारचे गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली. तिने सॅमविरोधामध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सॅम बॉम्बेला 23 सप्टेंबर 2020 ला गोव्यात अटक करण्यात आली होती.

या घटनेवेळी पूनम पांडे गोव्यातील कानाकोना गावात शूटिंग करत होती. या घटनेनंतर काही दिवसांनी पूनम पांडेने सॅम बॉम्बेशी समझोता केला आणि खटला मागे घेतला. त्यानंतर तिने सांगितले होते की, हा फक्त एक प्रसिद्धी स्टंट होता. 5 नोव्हेंबर 2020 रोजी पूनम पांडेला सरकारी इमारतीत नग्न व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पॉर्न रॅकेटमध्ये पूनम पांडेचेही नाव पुढे आले आणि गुन्हा दाखल झाला होता. पण 18 जानेवारी 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने तिच्या अटकेला स्थगिती दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakhani Bajar Samiti : लाखनी बाजार समितीत बिलांचा घोटाळा; बोगस जीएसटी बिल दाखवून फसवणूक, ६० टनाचा काटा जप्त

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला

Social Media: फेसबुक, इन्स्टाग्राम की एक्स; सर्वाधिक कमाई कुठून होते? वाचा सविस्तर

Sprouted Potatoes Risk : मोड आलेले बटाटे खाताय? आरोग्याला निर्माण होईल मोठा धोका, तज्ज्ञांचा इशारा

Param Sundari vs Baaghi 4 : 'परम सुंदरी' की 'बागी 4' बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? टायगर श्रॉफच्या चित्रपटाने 5व्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT