Poonam Pandey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey: 'मला पब्लिसिटीची गरज नाही', निधनाच्या अफवेनंतर ट्रोल करणाऱ्यांना पूनम पांडेने दिलं उत्तर

Poonam Pandey Trolled: आपल्या मृत्यूच्या अफवा पसरवणाऱ्या पूनम पांडेवर सध्या टीका केली जात आहे. तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत पूनम पांडेची शाळा घेतली.

Priya More

Poonam Pandey Dies:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आली होती त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. पूनम पांडेच्या निधनामुळे (Poonam Pandey Death) तिच्या चाहत्यांसह बॉलिवूड हादरले होते. सर्वजण सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करत होते.

पण रविवारी पूनम पांडेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आपण जिवंत (Poonam Pandey Alive) असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या मृत्यूच्या अफवा पसरवणाऱ्या पूनम पांडेवर सध्या टीका केली जात आहे. तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत पूनम पांडेची शाळा घेतली. अशामध्ये आता पूनम पांडेने ट्रोलिंग करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

पूनम पांडे तिच्या मृत्यूच्या बातमीनंतर चर्चेत आली आहे. पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी खोटी निघाल्यानंतर प्रत्येक जण पूनम पांडे आणि तिच्या पीआर टीमला ट्रोल करत आहेत. अनेकांनी तिच्या या कृत्याला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. या सगळ्या दरम्यान पूनम पांडेने ट्रोलिंगवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. पूनम पांडेने सांगितले की, 'तिने हे पब्लिसिटी स्टंटसाठी केले नाही आणि कोणत्याही औषध कंपनीचा यात सहभाग नाही. तिला फक्त सर्व्हायकल कॅन्सरबद्दल लोकांना जागरुक करायचं होतं.' तिने पुढे सांगितले की, 'मी माझ्या आईला घशाच्या कर्करोगाशी झुंज देताना पाहिले आहे. हे खूप कठीण आहे. मी हे सर्व केल्यानंतर आता लोकं गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर खूप बोलत आहेत. यानंतर लोक खूप जागरूक होत आहेत.'

पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी खोटी निघाल्यानंतर लोक तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. बिग बॉस 17 चे विजेते मुनावर फारुकी, दिशा परमार, राहुल वैद्य, करण कुंद्रा, कुशल टंडन, राखी सावंत, शार्दुल पंडीत आणि बाबिल खान यांनी पूनम पांडेच्या या कृत्याचा निषेध करत तिची चांगलीच शाळा घेतली. पूनम पांडेच्या या कृतीमुळे सामान्य लोकही संतापले आहेत. प्रत्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या या कृत्यावर राग व्यक्त करत आहेत.

दरम्यान, मृत्यूच्या अफवांनंतर रविवारी पूनमने आपण जिवंत असल्याचे सांगितले होते. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत सांगितले की, 'तुमच्या सर्वांसोबत काहीतरी महत्त्वाचे शेअर करायला मी समोर आली आहे. मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झाला नाही, परंतु दुर्दैवाने, या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल ज्ञानाच्या अभावामुळे हजारो महिलांचे प्राण गेले आहेत. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजागा आहे. मी इथे तुमच्या समोर या आजाराविषयी थोडक्यात माहिती द्यायला आली आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मुंबईच्या दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT