भारतामध्ये असे काही गायक आहेत त्यांना आपण कधीही वसरू शकणार नाही. हे गायक या जगामध्ये नसले तरी देखील त्यांनी गायलेली गाणी आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडतात आणि ती गाणी आजही प्रत्येक जण गाताना पाहायला मिळते. या गायकांच्या यादीमध्ये बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांना 'चिठ्ठी आयी है' सह अनेक अप्रतिम गाणी देणाऱ्या पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे नावही येते. पंकज उधास यांचे आज निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांचा आवाज नेहमीच प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत राहिल.
पंकज उधास हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईत्या ब्रीच क्रँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांना धक्का बसला असून संगीत जगतामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत चाहते दु:ख व्यक्त करत आहेत. आज आपण पंकज उधास यांच्या अशा गाण्याची लिस्ट पाहणार आहोत जी गाणं कधीच प्रेक्षक विसरु शकत नाही.
1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नाम 1986' या चित्रपटातील 'चिट्ठी आयी है' या गाण्याला पंकज उधास यांनी आवाज दिला होता. आजही हे गाणे ऐकून लोकं भावुक होतात. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटासोबतच पंकज उधास यांच्या आवाजानेही सर्वांना वेड लावले.
'और आहिस्ता कीजिए बातें...धडकनें कोई सुन रहा होगा और आहिस्ता कीजिए बातें... धडकनें कोई सुन रहा होगा' पंकज उधास यांच्या या गाण्याचा आजही अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये समावेश आहे. या गाण्याला यूट्यूबवर लाखो व्ह्युजही मिळाले आहेत. त्या काळामध्ये देखील हे गाणं सुपरहिट ठरले होते.
'नायब' चित्रपटातील हे खूप प्रसिद्ध गाणे आहे. 'एक तरफ उसका घर' असे या गाण्याचे नाव आहे. पंकज उधास यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. या अप्रतिम सादरीकरणाचे गीतकार जफर गोरखपुरी आहेत. हे गाणं खूपच सुपरहिट ठरले होते.
'चांदी जैसा रंग है तेरा' ही पंकज उधास यांची सर्वोत्कृष्ट गझल आहे. आजही ही गझल अनेक कार्यक्रमांमध्ये गायली जाते. अनेकांच्या ओठांवर त्यांची ही गझल असते. गझलचा प्रत्येक शब्द थेट हृदयाला भिडतो. या गझलचा मोठा चाहतावर्ग आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.