Bollywood Celebrities  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahadev Betting App Case: 'महादेव बेटिंग अ‍ॅप' अनेक सेलिब्रिटींना अडचणीत आणणार, ईडीची जवळपास ३४ बॉलिवूड कलाकारांवर नजर

Bollywood Celebrity On ED Radar: याप्रकरणामध्ये बॉलिवूडचे आणखी सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. एकूण ३८ सेलिब्रिटींवर ईडीची सध्या नजर आहे.

Priya More

Mahadev Book App:

महादेव बेटिंग अ‍ॅप'ने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना अडचणीत आले आहे. याप्रकरणाचा ईडीकडून कसून तपास सुरू आहे. ईडीने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.

अशामध्ये याप्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर येत आहे. याप्रकरणामध्ये बॉलिवूडचे आणखी सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. एकूण ३८ सेलिब्रिटींवर ईडीची सध्या नजर आहे. या सेलिब्रिटींची नावं देखील समोर आले आहेत. या सर्व सेलिब्रिटींच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि या अ‍ॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकार याचं याचवर्षी फेब्रुवारीमध्ये दुंबईत लग्न झालं होतं. सौरभच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्याचसोबत दुबईमध्ये सौरभच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आणि सक्सेस पार्टीमध्ये देखील बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. हे सर्व सेलिब्रिटी सध्या ईडीच्या रडारवर आहेत.

सौरभने आपल्या लग्नासाठी जवळपास २०० कोटींची उधळपट्टी केली होती. तसंच वाढदिवसाची पार्टी आणि सक्से पार्टीसाठी त्याने ६० कोटी रुपये खर्च केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. सौरभने बॉलिवूड सेलिब्रिटींना लग्नाला आणि वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी तसंच त्याच्या अ‍ॅपचे प्रमोशन करण्यासाठी मोठी रक्कम दिली असल्याचे देखील तपासातून समोर आले आहे. ईडीच्या रडारवर असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं देखील समोर आले आहेत. या सेलिब्रिटींमध्ये संजय दत्त, सुनील शेट्टी, नौरा फतेही, मौनी रॉय, टायगर श्रॉफ या सेलिब्रिटींसह अनेकांच्या नावाचा समावेश आहे.

ईडीच्या रडारवर असलेले बॉलिवूड सेलिब्रिटी -

- रणबीर कपूर

- मलायका अरोरा

- नोरा फतेही

- सारा अली खान

- मौनी रॉय

- उर्वशी रौतेला

- नर्गिस फाखरी

- नुसरत बरुचा

- सोनू सूद

- संजय दत्त

- टायगर श्रॉफ

- कपिल शर्मा

- रफ्तार

- दीप्ती साधवानी

- सुनील शेट्टी

- हार्डी संधू

- सुनील ग्रोव्हर

- सोनाक्षी सिन्हा

- रश्मिका मानधना

- गुरु रंधावा

- सुखविंदर सिंग

- डीजे चेतस

- अमित त्रिवेदी

- आफताब शिवदासानी

- सोफी चौधरी

- डेझी शाह

- नेहा शर्मा

- एलनाझ

- ज्योर्जिओ अ‍ॅड्रियानी

- इशिता राज

- शमिता शेट्टी

- प्रीती झांगियानी

- स्नेहा उल्लाल

- सोनाली सहगल

- इशिता दत्ता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT