Kartik Aaryan  Instagram @kartikaaryan
मनोरंजन बातम्या

'करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट...', Kartik Aaryan ने सुरू केली Bhool Bhulaiyaa 3 ची शूटिंग

Priya More

Bhool Bhulaiyaa 3:

'भूल भुलैया' (Bhool Bhulaiyaa Movie) आणि 'भूल भुलैया 2'च्या (Bhool Bhulaiyaa 2 Movie) दमदार यशानंतर आता 'भूल भुलैया 3' चित्रपट (Bhool Bhulaiyaa 3 Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.

कार्तिक आर्यनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर घरामधील देवांच्या पाया पडतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने 'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाल्याचे सांगितले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'करिअरमधील सर्वात मोठ्या चित्रपटाची सुरूवात करत आहे. शुभारंभ, भूल भुलैया 3' कार्तिकच्या या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी त्याला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या पोस्टवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, 'अनेक शुभेच्छा.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'देव कार्तिकला सपोर्ट करेल.' तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'मंजुलिका आणि रूह बाबा स्क्रीनवर पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.' याशिवाय अनेक यूजर्स या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करून आनंद व्यक्त करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाल्यामुळे कार्तिकच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यांच्याशिवाय या चित्रपटामध्ये तृप्ती डिमरी आणि विद्या बालन या देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात माधुरी दीक्षित दिसणार असल्याचा दावाही अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शाह हे देखील महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याबाबतचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. त्याचसोबत ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT