Malvika Raaj Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malvika Raaj Wedding: 'कभी खुशी कभी गम'मधील छोट्या करीनाचे गोव्यामध्ये धुमधडाक्यात लग्न, कपलचे क्यूट फोटो व्हायरल

Priya More

Kabhi Khushi Kabhie Gham Actress Malvika Raaj:

'कभी खुशी कभी गम' (kabhi khushi kabhie gham) या चित्रपटातील छोट्या करीनाची भूमिका साकारणारी आणि 'माता की चौकी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री मालविका राज (Malvika Raaj) बॉयफ्रेंड प्रणव बग्गसोबत विवाहबंधनात अडकली. मालविका राजचे गोव्यामध्ये धुमधडाक्यात लग्न झाले.

जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत मालविकाने प्रणव बग्गसोबत सात फेरे (Malvika Raaj Wedding) घेतले. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नववधूच्या रुपामध्ये मालिका खूपच सुंदर दिसत होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मालविका राज आणि प्रणव बग्ग या दोघांनीही आपापल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'आमची हृदये प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेली आहेत.' मालविका राजने लग्नामध्ये गोल्डन एम्ब्रॉयडरी केलेला लेहेंगा परिधान केला होता. तर प्रणव बग्गाने एम्ब्रॉयडरी केलेली शेरवानी घातली होती. नव वधूच्या रुपात मालविका खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. दोघांची जोडी खरोखरच खूपच छान दिसत होती. मालविका आणि प्रणवच्या लग्नातील अनेक खास क्षण त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत.

मालविकाच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह, सेलिब्रिटींनी कमेंट्स करत तिला आयुष्यातील नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. पूजा बत्रा, कृष्णा श्रॉफ आणि आहाना कुमरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मालविका राज आणि प्रणव बग्गा यांना शुभेच्छा दिल्या. प्रणवने मालविकाला या वर्षाच्या सुरुवातीला तुर्कीमध्ये प्रपोज केला होता. मालविका राजने ऑगस्ट 2023 मध्ये ईटी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रणवने तिला कसे प्रपोज केले होते ते सांगितले होते.

दरम्यान, 23 नोव्हेंबरला मालविका राजने मुंबईत प्रणव बग्गासोबत साखरपुडा केला होता. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होतो. या कपलच्या साखरपुड्याला बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यानंतर ३० नोव्हेंबरला हे कपल विवाहबंधनात अडकले आहेत. मालविकाचा नवरा प्रणव बग्ग ३० वर्षांचा असून तो बिझनेसमन आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT