Pankaj Udhas Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Pankaj Udhas Video: पंकज उधास यांचा शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल, गायकाला पाहून चाहत्यांचे डोळे पानावले

Pankaj Udhas Dies: पंकज उधास यांच्या निधनानंतर सध्या सोशल मीडियावर त्यांचा शेवटचा व्हिडीओ (Pankaj Udhas Video) व्हायरल होत आहे. पापाराझींनी एअरपोर्टवर पंकज उधास यांना स्पॉट केले होते.

Priya More

Pankaj Udhas Last Video:

संगीत विश्वातील अजरामर बादशहा पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. सोमवारी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. गायकाच्या कुटुंबाने त्यांच्या निधनाची माहिती देणारे निवेदन जारी केले होते. त्यानंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. पंकज उधास यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या प्रियजनांना मोठा धक्का बसला.

पंकज उधास यांना कॅन्सर झाला होता. काही काळ त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांच्या निधनानंतर सध्या सोशल मीडियावर त्यांचा शेवटचा व्हिडीओ (Pankaj Udhas Video) व्हायरल होत आहे. पापाराझींनी एअरपोर्टवर पंकज उधास यांना स्पॉट केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज उधास यांना काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते कुणालाही भेटले नव्हते. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. पंकज उधास यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

पंकज उधास यांची मुलगी नायब उधासने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पंकज उधास यांच्या अंत्यसंस्काराची माहिती दिली. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, 26 फेब्रुवारी 2024 रोजी दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले. मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान मुंबईतील वरळी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.'

नुकताच पंकज उधास यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा म्हणजेच जुलै 2023 चा आहे. जेव्हा पंकज उधास हे एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. पापाराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले होते. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पंकज उधास हे पापाराझींकडे पाहून हसताना आणि विचारपूस करताना दिसत आहेत. आता हा व्हिडिओ पाहून गायकाच्या चाहत्यांचे डोळे भरून आले आहेत. प्रत्येकजण या व्हिडिओवर कमेंट करताना आणि त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना दिसत आहे.

पंकज उधास यांनी 'नाम' चित्रपटात गाणं गाऊन प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटातील त्याचे 'चिठ्ठी आयी है' हे गाणे खूप गाजले. तेव्हापासून त्यांनी अनेक चित्रपटांना आपला सदाबहार आवाज दिला आहे. याशिवाय त्यांनी अनेक अल्बम रेकॉर्ड करून कुशल गझल गायक म्हणून जगभरात प्रसिद्धी मिळवली. पंकज उधास यांना 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT