Dunki Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dunki Movie: किंग खानचा 'डंकी' पाहा फ्रीमध्ये , अशा टिप्स फॉलो करून बुक करा तुमचं मुव्ही तिकीट

Priya More

Dunki Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' चित्रपट (Dunki Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा २१ डिसेंबरला संपली. हा चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी करत आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे.

या विकेंडमध्ये हा चित्रपट आणखी चांगली कमाई करेल असा अंदाज आहे. आता सलग ३ दिवस सुट्ट्या आल्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची चांगली संधी आहे. अशामध्ये शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ते फ्रीमध्ये या चित्रपटाचे तिकीट बुक करू शकतात ते कसं हे आज आपण जाणून घेणार आहोत. श

शाहरुख खानचा 'डंकी' पाहण्यासाठी तुम्ही घरी बसून फ्री चित्रपटाचे तिकीट बूक करू शकता. या कामासाठी आम्ही तुम्हाला एक उपयुक्त ट्रिक सांगणार आहोत. ही ट्रिक फॉलो करण्यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. डंकीचे फ्री तिकीट मिळविण्यासाठी, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये Book My Show ओपन करावे लागेल. अॅप उघडल्यानंतर डंकी चित्रपटाच्या बॅनरवर क्लिक करा. सिनेमा हॉल आणि सीट निवडा.

हॉल आणि सीट निवडल्यानंतर तुम्हाला पुढील स्टेपवर पेमेंट पर्यायावर टॅप करावे लागेल. पेमेंटचे पेजवर आल्यानंतर तुम्हाला More Payment Options या पर्यायांवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला रिडीम पॉइंट्स (Redeem Points) पर्यायावर टॅप करावे लागेल. रिडीम पॉइंट्सवर क्लिक केल्यानंतर बँकिंग पार्टनरची लिस्ट दिसेल. या लिस्टमध्ये तुम्हाला तुमची बँक निवडायची आहे. बँकेची निवड केल्यानंतर तुम्हाला क्रेडिट आणि डेबिट कार्ड हे दोन्ही पर्याय दिसतील.

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, जर तुम्ही बुक माय शो अॅपद्वारे चित्रपटाची तिकिटे बुक करत असाल तर तुम्हाला डेबिट कार्डचे शेवटचे चार अंक टाकावे लागतील. परंतु जर तुम्ही बुक माय शोच्या अधिकृत साइटवरून तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला संपूर्ण डेबिट कार्ड क्रमांक टाकावा लागेल. कार्ड आणि फोन नंबर टाकल्यानंतर चेक बॅलन्सवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पॉइंट्स दिसतील. हे पॉईंट्स तुम्ही डेबिट कार्ड वापरताना कमावलेले असतात. हेच पाईंट्स बुक माय शोच्या माध्यमातून मोफत चित्रपटाची तिकिटे मिळण्यास तुम्हाला मदत करतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT