Diljit Dosanjh First Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Diljit Dosanjh च्या 'चमकिला'चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपटासाठी Parineeti Chopra ने गायली १५ गाणी

Chamkila Movie: इम्तियाज अली (Imtiaz Ali) दिग्दर्शित हा चित्रपट अमर सिंग 'चमकिला' (Chamkila Movie) यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझ हा अमर सिंग यांची भूमिका साकारत आहे.

Priya More

Diljit Dosanjh And Parineeti Chopra:

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सध्या चर्चेत आहे. दिलजीत दोसांझ त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट चमकीलामुळे चर्चेत आहे. नुकताच निर्मात्यांनी या चित्रपटातील दिलजीतचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. इम्तियाज अली (Imtiaz Ali) दिग्दर्शित हा चित्रपट अमर सिंग 'चमकिला' (Chamkila Movie) यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझ हा अमर सिंग यांची भूमिका साकारत आहे. 'चमकिला'च्या फर्स्ट लूकमध्ये एका कॅसेटवर दिलजीत दोसांझचा फोटो दिसत आहे. 'चमकिला'मधून दिलजीतची पहिली झलक समोर आल्यानंतर चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

नेटफ्लिक्सने नुकतेच सोशल मीडियावर 'चमकिला'चे मूविंग पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले की, 'माहोल बन जाता था जब वो छेडता था साज, कुछ ऐसा ही था चमकिला का अंदाज.' अमर सिंह 'चमकिला'चे आयुष्य पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा अखेर पूर्ण होणार आहे. 'चमकिला' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नसून थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

दिलजीत दोसांझ स्टारर 'चमकिला' हा चित्रपट १२ एप्रिल २०२४ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज होणार आहे.'चमकिला'मध्ये दिलजीत दोसांझसोबत परिणीती चोप्राही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'चमकिला' या चित्रपटात एआर रहमान यांनी संगीत दिले आहे. तर इर्शाद कामिलने गाण्याचे बोल लिहिले आहेत.

रेहमान आणि इम्तियाज यांच्या बहुप्रतिक्षित आणि जादुई सहकार्याची चित्रपट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. महत्वाचे म्हणजे, दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यांनी चमकिला चित्रपटातील अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रानेही काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने या चित्रपटातील १५ गाण्यांना आवाज दिला आहे. प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : डाएट, व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? 'या' चुका आहेत कारणीभूत

Maharashtra News Live Update: नागपुरात उद्या शांतता मार्च, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सिजेपी देशभरात रस्त्यावर उतरणार

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! वऱ्हाडाच्या बसची कंटेनरला धडक; १० ते १२ प्रवासी गंभीर, पाहा VIDEO

Ramesh Mhatre : मोठी बातमी! नगरसेवक रमेश म्हात्रेंना कोर्टाचा दणका, शरण येण्याचे आदेश

High blood pressure: हाय बीपीचा त्रास एका रात्रीत होत नाही; शरीरात दिसतं हे 1 सायलेंट लक्षण

SCROLL FOR NEXT