Jaya Prada Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Prada: भाजपच्या माजी खासदार जया प्रदा आहेत कुठे?, रामपूर कोर्टाने पुन्हा जारी केलं अजामीनपात्र वॉरंट

Actress Jaya Prada: 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान जया प्रदा यांच्याविरोधात स्वार आणि केमरी पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची सुनावणी खूप दिवसांपासून सुरू आहे.

Priya More

Non Bailable Warrent Against Jaya Prada:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांच्या अडणीमध्ये वाढ झाली आहे. आचारसंहिता भंगाच्या दोन प्रकरणांत फरार जया प्रदा यांच्याविरुद्ध रामपूर न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. बुधवारी न्यायालयाने त्यांच्या मुदतवाढीचा अर्ज फेटाळून लावला आणि बाँडची रक्कमही जप्त केली आहे. यावेळी न्यायालयाने पुन्हा एकदा पोलिसांना जया प्रदा यांना अटक करून हजर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान जया प्रदा यांच्याविरोधात स्वार आणि केमरी पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची सुनावणी खूप दिवसांपासून सुरू आहे. मात्र जया प्रदा एकदाही कोर्टात हजर झाल्या नाहीत. त्यांच्याविरोधात अनेकवेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. जया प्रदा यांना अटक करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. पोलिस दिल्ली आणि मुंबईतही त्यांचा शोध घेत आहेत.

रामपूर पोलिसांचे असे म्हणणे आहे की, जया प्रदा कुठेही सापडल्या नाही. पहिल्या प्रकरणात सहा वेळा आणि दुसऱ्या प्रकरणात पाच वेळा अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. जया प्रदा यांनी 2019 लोकसभा निवडणूक रामपूरमधून भाजपच्या तिकिटावर लढवली होती. त्यांच्यावर स्वार आणि केमरी पोलिय ठाण्यात निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्वार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असतानाही 19 एप्रिल रोजी नूरपूर गावात एका रस्त्याचे उद्घाटन केल्याचा आरोप जया प्रदा यांच्यावर आहे. दुसरी घटना केमरी पोलिस ठाण्यातील आहे. पिपलिया मिश्रा गावात आयोजित जाहीर सभेत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप जया प्रदा यांच्यावर आहे. या दोन्ही प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचले आहे. आता न्यायालयाच्या आदेशानंतर जया प्रदा सुनावणीला येतात की नाही हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT