
'बिग बॉस'चा यंदाचा १७ वा (Bigg Boss 17) सीझन खूपच चांगला चर्चेत राहिला आहे. या सीझनमध्ये घरातील सर्व स्पर्धकांची भांडणं, प्रेम, रुसवे-फुगवे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अशामध्ये बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त चर्चा मुनावर फारुकी (Munawar Faruqui) आणि त्याच्या नात्याची होत आहे. एक्स गर्लफ्रेंड आयशा खानने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. मुनव्वरने तिला आणि नाझिला सिताशीला एकत्र डेट केल्याचा आरोप आयशाने केला आहे.
आता मुनव्वरने शोमध्ये नाझिलावर (nazila sitaishi) निशाणा साधला. तेव्हा मुनव्वरने आयशाला सांगितले की, 'नाजिला मला धमकी देत होती त्यामुळे मी ब्रेकअप करू शकत नव्हतो.' मुनव्वरने केलेल्या आरोपानंतर आता नाजिलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या चर्चेत आली आहे.
मुनावर फारुकीने आपल्या बचावात सांगितले की, 'मी नाझिलासोबत आहे कारण तिने मला धमकी दिली होती की जर मी तिला सोडले तर ती माझे आयुष्य उध्वस्त करेल.' मुनव्वरने तर नाझिलाने आपल्या बहिणीबद्दल वाईट बोलल्याचा खुलासा केला होता. त्यामुळेच त्याने नाझिलाशी संबंध तोडले असल्याचे त्याने सांगितले. आता नझिलाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नाझिलाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले की, 'स्वत:चा बचाव करण्यासाठी लोकं खोटं बोलतात. ही लज्जास्पद बाब आहे.' नाझिलाने या गूढ पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, नझिलाने मुनव्वरला लक्ष्य केल्याचे तिच्या चाहत्यांना वाटत आहे.
मागच्या एपिसोडमध्ये आयशाने पुन्हा एकदा मुनव्वरवर गंभीर आरोप केले होते. तिने सांगितले होते की, 'मुनव्वर फक मला आणि नाझिलालाच नाही तर इतरही काही मुलींना डेट करत होता. तो बाहेर कोणत्या तरी मुलीला प्रपोझ करून आला आहे. म्युजिक व्हिडीओच्या बहाण्याने तो मुलींना भेटतो. पण कोणताच म्युजिक व्हिडीओ नसतो. त्याच्या आयु्ष्यामध्ये २-३ मुली होत्या. तो नाझिलाला देखील धोका देत आहे.'
दरम्यान, बिग बॉसच्या घरामध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे. सध्या मुनव्वरची बहीण बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहे. त्याचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे की ती कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटते, पण ती आयशा खानकडे दुर्लक्ष करते. यासोबतच ती तिच्या भावाला सांगते की, 'निदान तिने काहीतरी चुकीचे केले आहे याची तिला जाणीव करून दे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.