kangana rauant tweet on pm narendra modi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: भाजपच्या यशानंतर कंगनाला अत्यानंद, PM मोदींची केली श्रीरामांसोबत तुलना

Priya More

Assembly Election 2023 Result:

देशातील ४ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाकडे (Assembly Election 2023) सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निकालाचे चित्र काही तासांमध्येच स्पष्ट होईल. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने भरघोस मतं मिळवली आहेत. या तिन्ही राज्यात भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. फक्त तेलंगनामध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही.

सध्या सर्वस्तरावरून भाजपचे कौतुक होत आहे. बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी देखील भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देऊ लागले आहेत. कंगना रनौतने (Kangana Ranaut) यासंदर्भात केलेले ट्वीट सध्या चर्चेत आले आहे. या ट्विटमुळे कंगना रनौतला ट्रोल केले जात आहे.

कंगना रनौतने आपल्या अधिकृत 'एक्स' म्हणजेच ट्विटर अकाऊंटवर तीन राजांमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ट्वीट केले आहे. तिने पीएम मोदींचा फोटो शेअर करत त्यावर 'राम आए है!'असे लिहिले आहे. या ट्विटमध्ये तिने #ElectionResult हा हॅशटॅग वापरला आहे. कंगना रनौतने मोदींची तुलना भगवान रामांसोबत केली आहे. कंगनाचे हे ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्विटनंतर तिला ट्रोल केले जात आहे.

कंगना रनौतने आणखी एक ट्वीट केले आहे. कंगना रनौतने ट्रोलर्सला उत्तर देखील दिले आहे. एका युजरने लिहिले की, 'खरंच तू हिंदू देवांसोबत तुलना करत आहे का?... हिंदू धर्मामध्ये याची परवानगी आहे का?' युजरच्या या प्रश्नाला कंगनाने उत्तर दिले आहे. तिने असे लिहिले की, 'हा याची परवानगी आहे. गीतामध्ये श्रीकृष्णाने सांगितले की, जो माझा भक्त आहे. माझ्यामध्ये लीन आहे. तो मीच आहे. त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. ऐवढं गोंडस आणि शांत देव आहेत आपले. कोणी आपलं मुंडकं कापणार नाही. तुम्ही पण या आमच्या टीममध्ये.'

कंगनाने पुढे लिहिले की, 'सोबतच माझ्या बोलण्याचा अर्थ आहे की, अयोध्यामध्ये मोदीजी भगवान रामाला घेऊन आले आहेत. तर जनता त्यांना घेऊन आली आहे...पण तुम्हाला जे वाटले ते देखील चुकीचे नाही.' कंगना रनौत सध्या या ट्वीटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या ट्वीटमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, कंगना रनौत नुकताच 'तेजस' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. लवकरच कंगना पॉलिटिकल ड्रामा 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये तिने पंतप्रधान इंदिरा गांधीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये कंगनासोबत अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि सतीश कौशिक मुख्य भूमिकेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT