asha bhosle and r d burman Saam Tv
मनोरंजन बातम्या

Asha Bhosale Birthday: पहिला नवरा १५ वर्षांनी मोठा, तर दुसरा ६ वर्षांनी लहान; अशी आहे आशा भोसलेंची फिल्मी लव्ह लाइफ

Asha Bhosale Bday Special: आशा भोसले यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत १६ हजारांपेक्षा जास गाणी गाण्याचा विक्रम केला आहे.

Priya More

Asha Bhosale Birthday Special:

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत (Hindi And Marathi Film Industry) आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या आशा भोसले यांचा आज वाढदिवस आहे. शास्त्रीय संगीत आणि गजलपासून ते पॉप म्युजिकपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आशा भोसले (Asha Bhosale) यांनी आपल्या आवाजाची जादू कायम ठेवली आहे. फक्त मराठी आणि हिंदीच नाही तर गुजराती, पंजाबी, बंगाली, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रूसी या भाषांमध्ये त्यांनी गाणं गायलं आहे. आशा भोसले यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत १६ हजारांपेक्षा जास गाणी गाण्याचा विक्रम केला आहे. आशा भोसले यांचा आज ९० वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या फिल्मी लव्ह लाइफबद्दल जाणून घेणार आहोत...

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ साली महाराष्ट्रच्या सांगली जिल्ह्यामध्ये झाला होता.त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे उत्कृष्ट गायक होते. त्यांनी आपल्या वडिलांकडूनच संगीताचे धडे घेतलो होते. आशा भोसले ९ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईला आले. वडिलांच्या मृत्यूनंतर आशा भोसले आणि त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांच्यावर कुटंबाची जबाबदारी आली. त्यानंतर लता मंगेशकर यांनी चित्रपटांमध्ये अभिनय आणि गाणी गायला सुरुवात केली. मोठ्या बहिणीच्या पायावर पाय ठेवत आशा भोसले यांनी देखील गाणी गायला सुरुवात केली.

आशा भोसले यांची लव्हलाइफ खूपच चर्चेत राहिली होती. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी आशा ३१ वर्षीय गणपतराव भोंसले यांच्याशी लग्न केले. त्यावेळी आशा भोसले यांचे पती त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे होते. परिवाराच्या विरोधात जाऊन त्यांनी हे लग्न केले होते. त्यामुळे त्यांना पळून जावे लागले होते. गणपतराव भोसले हे लता मंगेशकर यांचे स्वीय सचिव होते. लतादीदींसह संपूर्ण मंगेशकर कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. पण आशाने ऐकले नाही. यामुळे लता आणि आशा यांच्यातील नातेसंबंध बिघडले होते आणि वर्षानुवर्षे दोघेही बोलत नव्हते.

आशा भोसले यांना गणपतरावांपासून तीन मुले होती. मोठ्या मुलाचे नाव हेमंत असून तो पायलट होता. नंतर हेमंतने संगीत दिग्दर्शक म्हणूनही काही चित्रपट केले. मुलगी वर्षा वृत्तपत्रांसाठी लिहायची. धाकटा मुलगा आनंद व्यवसाय आणि चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास करतो आणि आशा भोसले यांची कारकीर्द सांभाळतो. आशा भोसलेंची मुलगी वर्षाने २०१२ मध्ये वयाच्या ५६ व्या वर्षी आत्महत्या केली होती.

आशा भोसले यांनी दुसरं लग्न दिग्गज संगीतकार राहुल देव बर्मन म्हणजेच आर डी बर्मन यांच्याशी केले होते. ते आशा भोसलेंपेक्षा 6 वर्षांनी लहान होते. आरडीचेही हे दुसरे लग्न होते. आरडी बर्मन आणि आशा भोसले यांची पहिली भेट १९५६ मध्ये झाली होती. तोपर्यंत आशा भोसले यांनी इंडस्ट्रीत चांगले नाव कमावले होते. तर आरडी बर्मन हे प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांचे चिरंजीव होते.

सुमारे १० वर्षांनंतर आरडी बर्मन यांनी 'तीसरी मंझिल' या चित्रपटासाठी गाण्यासाठी आशा भोसले यांच्याशी संपर्क साधला. आरडी बर्मन यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रीता पटेल होते. ते आपल् पहिल्या पत्नीवर खूप नाराज होता आणि वेगळे झाले होते. आशा भोसले आणि आरडी बर्मन यांनी लग्न केले. त्यानंतर आशा यांनी शेवटपर्यंत आरडी बर्मन यांना साथ दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

Mumbai ganeshotsav: देशातील सर्वात श्रीमंत बाप्पा, 474 कोटींचा गणपती

Mumbai Rain: मुंबईकरांनो, घरातून बाहेर पडू नका! IMD कडून ३ तास धोक्याचा इशारा, त्यात वाहतूककोंडी अन् लोकलला लेट मार्क!

SCROLL FOR NEXT