Tripti Dimri Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tripti Dimri: अनुष्का शर्माच्या भावासोबत ब्रेकअप, आता 'या' बिझनेसमनला डेट करतेय तृप्ती डिमरी

Priya More

Tripti Dimri Boyfriend:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अ‍ॅनिमल' चित्रपट (Animal Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तर बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये हा चित्रपट दमदार कमाई करत दिवसेंदिवस रेकॉर्ड मोडत आहे. या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधत मन जिंकले. या चित्रपटमध्ये रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) इंटिमेट सीन्स देणारी अभिनेत्री तृप्ती डिमरीला (Tripti Dimri) खूपच चांगली पसंती मिळाली. तृप्ती डिमरीची या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका होती पण तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सध्या तृप्ती डिमरीचीच सगळीकडे चर्चा होत आहे. या चित्रपटानंतर तृप्ती डिमरीचा सोशल मीडियावरील फॅन फॉलोइंग प्रचंड वाढला आहे. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटामध्ये काम करून देखील तृप्ती डिमरीबद्दल अनेकांना माहिती नव्हते. पण 'अ‍ॅनिमल'मुळे तृप्ती डिमरी प्रकाशझोतामध्ये आली. या चित्रपटात तृप्ती डिमरीने रणबीर कपूरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तृप्ती डिमरीची छोटी भूमिका होती पण ती लोकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरली. तृप्ती डिमरीबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या चित्रपटानंतर तृप्ती डिमरीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. आज आपण तृप्तीच्या लव्हलाइफबद्दल जाणून घेणार आहोत...

मीडिया रिपोर्टनुसार, तृप्ती डिमरी मॉडेल-बिझनेसमन सॅम मर्चंटला डेट करत आहे. महत्वाचे म्हणजे याआधी तृप्ती डिमरी अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्माला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच जाहीरपणे बोलले नाही. पण आता तृप्ती डिमरीचे सॅम मर्चंटसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तृप्ती डिमरीच्या फॅन पेजवरून काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. सॅम मर्चंट व्यतिरिक्त तृप्ती डिमरीसोबत आणखी काही जण या फोटोमध्ये दिसत आहेत. तर एका पोस्टमध्ये तृप्ती डिमरी आणि सॅम मर्चंट सेल्फी घेताना दिसत आहेत. या फोटोंनंतर तृप्ती डिमरी आणि सॅम मर्चंट हे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र अद्याप तृप्ती डिमरीने याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT