Amitabh Bachchan Post  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan News : ऐश्वर्या राय भारतात परतताच अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत, 'डीप इमोशन'बद्दल म्हणाले...

Amitabh Bachchan Post : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून रिलेशनमुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेल्या काही दिवसांपासून रिलेशनमुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. पण असं असलं तरीही बच्चन कुटुंबीयांकडून घटस्फोटाच्या चर्चांवर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. पण काही मिडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या बच्चन कुटुंबासोबत राहत नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आपल्या लेकीसोबत परदेशात व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत अभिषेक नव्हता. आता ऐश्वर्या आणि आराध्या भारतात आल्या आहेत. त्या दोघीही भारतात आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक्स पोस्ट शेअर केलेली आहे. ह्या एक्स पोस्टमध्ये बिग बींनी कुटुंबामध्ये असलेल्या मतभेदाच्या चर्चांवर भाष्य केले आहे. बिग बींनी पोस्टमध्ये 'डीप इमोशन'वर भाष्य केले आहे.

बिग बी अमिताभ बच्चन कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. कायमच त्यांच्या पोस्टची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. शेअर केलेल्या पोस्टमध्ये बिग बींनी लिहिलंय की, "T 5089 - केबीसीमध्ये काम बराच वेळ सुरू असते. पण स्पर्धकांसोबत संवाद साधल्यामुळे मला गूढ भावना आणि रोमांचक अनुभव मिळतो. " बिग बींची ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल होत असून चाहत कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असून अमिताभ बच्चन यांनी त्या मुद्द्यावर भाष्य केलेले नाही. बिग बी कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात पण मुलाच्या घटस्फोटाबद्दल बोलत नाहीत. बच्चन कुटुंबात मतभेदाच्या चर्चा होत असताना बिग बी यांनी अनेकदा गूढ पोस्ट शेअर शेअर केलेल्या होत्या. त्यांनी यापूर्वी १३ जुलैला त्यांच्या ब्लॉगमध्ये हरवलेलं आणि विसरलेलं काय आहे, याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT