Wallah Habib Song Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

'बडे मियाँ छोटे मियाँ' मधलं 'वल्लाह हबीबी' गाणं आऊट, Akshay Kumar आणि Manushi Chhillar ची जबरदस्त केमिस्ट्री

Wallah Habib Song Released: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटातील 'वल्लाह हबीबी' हे नवीन गाणं आज रिलीज झाले. सध्या सोशल मीडियावर हे गाणं धुमाकूळ घालत आहे.

Priya More

Bade Miyan Chote Miyan Movie:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) बहुप्रतिक्षित 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan Movie) या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटातील सर्व कलाकार हे प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाबाबतचे एक-एक अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. अशामध्ये या चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नुकताच 'वल्लाह हबीबी' (wallah habib song) हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं धुमाकूळ घालत आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटातील 'वल्लाह हबीबी' हे नवीन गाणं आज रिलीज झाले. जबरदस्त दृश्य आणि ग्लॅमरच्या स्पर्शाने सजलेले हे गाणे प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. या गाण्यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत मानुषी छिल्लर देखील दिसत आहे. अक्षय कुमारसोबत मानुषी छिल्लर रेड कलरच्या ड्रेसमध्ये जबरदस्त डान्स मूव्ह्स करताना दिसत आहे.

'वल्लाह हबीबी' हे गाणं विशाल ददलानी, विशाल मिश्रा आणि दीपकी यानी गायलं आहे. तर विशाल मिश्राने या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार इर्शाद कामिल यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे कोरिओग्राफर बॉस्को सीझर आहे. हे गाणे अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर आणि अलाया फर्निचरसोबत शूट करण्यात आले आहे. रिलीज झाल्यानंतर हे गाणं अवघ्या काही तासांमध्येच युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.

दरम्यान, पूजा एन्टरटेन्मेंट आणि एएझेड फिल्म्स निर्मित, अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट याच वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 10 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 350 कोटी रुपये आहे. हा चित्रपट किती कमाई करतोय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT