Shaitaan Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaitaan Advance Booking: अजय देवगणच्या 'शैतान'ने रिलीजपूर्वीच केली बक्कळ कमाई, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले इतके कोटी

Ajay Devgan And R Madhvan Film: हा चित्रपट येत्या ८ मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे.

Priya More

Shaitaan Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर. माधवन (R Madhvan) 'शैतान' चित्रपटामुळे (Shaitaan Movie) चर्चेत आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हॉरर थ्रिलर 'शैतान' चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. टीझर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशामध्ये हा चित्रपट येत्या ८ मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. त्यामुळे रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

शैतान चित्रपटाचे सध्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. पहिल्या दिवसाच्या शोसाठी या चित्रपटाची २८ हजार तिकीटं विकली गेली आहेत. या चित्रपटाने या तिकीटाच्या माध्यमातून ६६ लाख रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून आणखी कमाई करण्याची शक्यता आहे. देशभरामध्ये या चित्रपटाचे ४,५५४ शो होणार आहेत. या चित्रपटाबाबत प्रेक्षक उत्सुक असून अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून हा चित्रपट आणखी कमाई करेल.

हा चित्रपट गुजराती चित्रपट 'वश'चा रिमेक आहे. चित्रपटाची कथा जादूटोणा आणि वशिकरणावर आधारित आहे. सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रपटामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. तर आर माधवन शैतानाच्या भूमिकेत आहे. साऊथ अभिनेत्री ज्योतिकाने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण आपल्या कुटुंबाला काळ्या जादूपासून वाचवताना दिसणार आहे.

विकास बहलने 'शैतान' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जादूटोणा, सस्पेन्स आणि गडद जगावर आधारित हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दावा केला आहे की, शैतान हा आतापर्यंतचा सर्वात भितीदायक चित्रपटांपैकी एक आहे. जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला तर यानंतर अनेक भितीदायक चित्रपट येण्याचा मार्ग मोकळा होईल.

दरम्यान, शैतान चित्रपटानंतर या वर्षात अजय देवगणचे ५ चित्रपट रिलीज होणार आहेत. यामध्ये रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन', 'औरो में कहा दम था', 'रेड २' या चित्रपटांचा समावेश आहे. अजय देवगणचे चित्रपट हे त्याच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची खास पर्वणी असणार आहे. ते या चित्रपटाच्या रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

Sharad Pawar: महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य पुन्हा उभे करावे लागेल- शरद पवार|VIDEO

Maharashtra Politics : चपलेचा प्रसाद देईल; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदारावर रुपाली ठोंबरे भडकल्या

Investment Tips: फक्त १००० रूपयांची गुंतवणूक करा अन् लखपती व्हा, कसं ते जाणून घ्या?

SCROLL FOR NEXT