Tamannaah Bhatia Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाची स्पेशल ऑप्स'चे दिग्दर्शक नीरज पांडेच्या चित्रपटात एन्ट्री

Tamannaah Bhatia Upcoming Film: तमन्ना भाटीया प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. तमन्ना भाटिया 'स्पेशल ऑप्स' फेम दिग्दर्शक नीरज पांडेच्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Tamannaah Bhatia Movie:

दाक्षिणात्य तसेच बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर कायम प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री तमन्ना भाटीया लाइमलाइटमध्ये आली आहे. सध्या तमन्ना भाटिया तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. विजय वर्मासोबतच्या अफेअरमुळे तमन्ना चर्चेत राहते. अशामध्ये आता ती तिच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. तमन्ना भाटिया 'स्पेशल ऑप्स' फेम दिग्दर्शक नीरज पांडेच्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या हातामध्ये यावर्षी अनेक चित्रपट आहेत. अलीकडेच तिने तिच्या आगामी 'ओडेला 2' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आणि आता तमन्ना दिग्दर्शक नीरज पांडेच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये मुख्य भूमिकेसाठी एन्ट्री करणार आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तमन्ना भाटिया लवकरच नीरज पांडेच्या शीर्षक नसलेल्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या 'चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही आणि टीम अजूनही इतर स्टार कास्टबद्दल विचार करत आहे.'

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'चित्रपटाचे शूटिंग २४ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून या वर्षाच्या अखेरीस चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाचा प्रीमियर थिएटरमध्ये नाही तर OTT प्लॅटफॉर्मवर होईल. नीरज पांडे हे 'स्पेशल ऑप्स'च्या स्टार कास्टमधून मुख्य अभिनेत्याच्या शोधात आहे. जेणेकरुन तो अशा व्यक्तीसोबत काम करू शकेल ज्याच्यासोबत त्याने आधीच सहकार्य केले आहे.

नीरज पांडे यांची टीम नवीन प्रोडेक्टबाबत बरीच गुप्तता पाळत आहे. सूत्राचे म्हणणे आहे की, 'त्याला चित्रपटाविषयी काहीही बोलायचे नाही. त्यामुळे ते लपवून ठेवण्यात आले आहे. सेटवरही जॅमर लावले आहेत. शूटिंगच्या पहिल्या दिवशी खूप कमी लोकं उपस्थित होते.' तमन्ना भाटियाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेत्री 2023 मध्ये 'लस्ट स्टोरीज', 'आखरी सच' आणि 'जेलर' सारख्या चित्रपटामध्ये दिसली होती. आता तमन्नाच्या हातामध्ये 'ओडेला २' चित्रपट आहे. या व्यतिरिक्त तमन्ना भाटिया जॉन अब्राहमसोबत 'वेदा' मध्येही दिसणार आहे. त्यासोबत ती तमिळ चित्रपट 'अरनमानई 4' मध्येही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow Colour Saree: श्रावणातल्या खास सणासुदींसाठी नेसा ही पिवळ्या रंगाची आकर्षक साडी

Maharashtra Live News Update : पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

Amar Kale : योजनांवर कोट्यावधीचा खर्च मात्र शिक्षणावर दुर्लक्ष; खासदार अमर काळे यांची सरकारवर टीका

सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती?|What Is The Best Time To Wake Up in the Morning

Maharashtra Politics : महायुती आणि मविआला हादरा; राज्यात नव्या आघाडीची नांदी, कुणाला फायदा अन् फटका?

SCROLL FOR NEXT