Ratan Tata And Simi Garewal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ratan Tata: 'वो कहते हैं तुम चले गए...', रतन टाटा यांच्या निधनानंतर सिमी गरेवाल यांची भावुक पोस्ट

Priya More

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. रतन टाटा यांनी बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या सर्वांना धक्का बसला असून संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी भावुक पोस्ट केली आहे.

७० आणि ८० च्या दशकात पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल आणि रतन टाटा यांच्यामध्ये मैत्री होती. सिमी यांनी देखील हे मान्य केले. आज रतन टाटा यांच्या निधनानंतर सिमी गरेवाल यांना दु:ख झाले. त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

सिमी गरेवाल यांनी आपल्या प्रतिष्ठित टॉक शो 'रेंडेजवस विद सिमी गरेवाल'मधील रतन टाटा यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'ते म्हणतात तू गेला आहेस...हे सहन करणं खूप कठीण आहे...खूप कठीण आहे. अलविदा माय फ्रेंड. #रतनटाटा.'

सिमी गरेवाल यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये रतन टाटा यांच्यासोबतच्या मैत्रीबाबत सांगितलं होतं. २०११ मध्ये एका मुलाखतीत सिमी गरेवाल यांने रतन टाटांसोबतच्या त्यांच्या मैत्रीबद्दल उघडपणे बोलल्या होत्या. त्यांनी सांगितले होते की, 'त्यांचे आणि रतन टाटा यांचे नाते खूप जुने होते. त्यांनी रतन टाटा यांना 'परफेक्ट जेंटलमॅन' असे म्हणत सांगितले होते की, 'ते परफेक्ट आहेत, त्यांच्यात विनोदाची भावना आहे, ते सभ्य आणि परिपूर्ण गृहस्थ आहेत. पैसा ही त्याची प्रेरक शक्ती कधीच नव्हती.'

रतन आणि सिमी यांची मैत्री होती. रतन टाटा यांच्याशी त्यांची मैत्री वर्षानुवर्षे कायम राहिली. रतन टाटा यांच्या निधनानंतर सिमी यांनी शोक व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alia Bhatt : अगं बाई किती गोड! 'नाटू नाटू' गाण्यावर थिरकते आलियाची लेक

Central HomeMinister Amit Shaha : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन

Jalna News : तलवारीने केक कापणे पडले महागात; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

Dussehra Rangoli : दसऱ्यानिमित्त अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा 'या' सुबक रांगोळी

Maharashtra News Live Updates: भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांची तब्येत खालावली, उपचारासाठी मुंबईकडे रवाना

SCROLL FOR NEXT