Rashmika Mandanna Instagram
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna Post: '...याचं मी नेहमी स्वप्न पाहिलं', 'ॲनिमल'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर रश्मिका मंदान्नाची पोस्ट चर्चेत

Animal Movie Collection: रश्मिका मंदान्ना ही फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीची नाही तर बॉलिवूडची देखील प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. 'गुडबाय' आणि 'मिशन मजनू'नंतर रश्मिका मंदान्नाचा 'ॲनिमल' हा तिसरा बॉलिवूड चित्रपट आहे.

Priya More

Rashmika Mandanna Instagram Post:

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'ॲनिमल' चित्रपट (Animal Movie) सध्या बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले. या चित्रपटातील रश्मिका मंदान्नाच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले.

रश्मिका मंदान्ना ही फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीची नाही तर बॉलिवूडची देखील प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. 'गुडबाय' आणि 'मिशन मजनू'नंतर रश्मिका मंदान्नाचा 'ॲनिमल' हा तिसरा बॉलिवूड चित्रपट आहे. तिचा 'ॲनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता रश्मिका मंदान्नाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिची सर्व स्वप्ने पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.

रश्मिका मंदान्नाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. 'ॲनिमल'च्या यशानंतर रश्मिका मंदान्ना सध्या सुट्ट्या इन्जॉय करत आहे. या सुट्ट्या इन्जॉय करताना काढलेला फोटो रश्मिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रस्त्यावर मधोमध उभं राहून रश्मिकाने हा फोटो काढला आहे. रश्मिकाच्या चेहऱ्यावरील स्माइल खूपच सुंदर आहे. या फोटोमध्ये रश्मिकाने ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स परिधान केले आहे. तसेच तिने पाठीमागे ब्लॅक कलरची बॅग अडकवली आहे. सिंपल आणि कॅज्युअल लूकमध्येही रश्मिकाचे सौंदर्य चाहत्यांची मने जिंकत आहे.

हा फोटो शेअर करताना रश्मिका मंदान्नाने सुंदर कॅप्शन दिले आहे. जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कधी कधी तुम्ही थांबून फक्त विचार करा. अरे यार... हे सर्व कसे घडले. हे सर्व कधी झाले. हे सर्व काय झाले? आणि हे सर्व घडले याचा मला खूप आनंद आहे... कृतज्ञ, शांत आणि आनंदी आहे. हे सर्व ते आहे ज्याचे मी नेहमी स्वप्न पाहिले आहे.'

रश्मिकाने या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'मला ते कळत नाही आणि मी अशा गोष्टीकडे धावत राहते ज्याबद्दल मला माहितीही नाही. परंतु योग्य लोकांसोबत राहिल्याने तुम्हाला हे जाणवते की कधी कधी थांबून अनुभवले पाहिजे की ते हेच आहे. ही तीच गोष्ट आहे ज्याचे स्वप्न पाहत ही छोटी मुलगी मोठी झाली.' रश्मिका मंदान्नाच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. रश्मिकाच्या या पोस्टला ११ लाखांपेक्षा जास्त जणांनी लाइक केले आहे.

रश्मिका मंदान्नाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल'मध्ये रश्मिका मंदान्नाने गीतांजलीची भूमिका साकारली आहे. नेहमीप्रमाणेच या अभिनेत्रीने गीतांजलीच्या पात्रात जीव टाकला. १ डिसेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ८८२ कोटींची कमाई केली आहे. 'ॲनिमल'नंतर रश्मिका मंदान्ना बहुप्रतिक्षित 'पुष्पा २' या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT