Malati Merry Jonas Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra: 2 वर्षांची झाली मालती, प्रियांका चोप्राने खास अंदाजमध्ये सेलिब्रेट केला लिटिल एंजलचा बर्थडे

Malati Merry Jonas Birthday: मालतीच्या बर्थडेचे इनसाइड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निक जोनासने लाडक्या मुलीच्या बर्थडेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Priya More

Priyanka Chopra And Nick Jonas:

बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनासची (Nick Jonas) मुलगी मालती मेरी जोनास दोन वर्षांची झाली. नुकताच प्रियांका आणि निकने खास अंदाजमध्ये मालतीचा दुसरा वाढदिवस साजरा केला. मालतीच्या बर्थडेचे इनसाइड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निक जोनासने लाडक्या मुलीच्या बर्थडेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालतीचा बर्थडे लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. प्रियांका आणि निकचे चाहते या पोस्टवर कमेंट्स करत मालतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

प्रियंका चोप्राने नुकताच आपली मुलगी मालतीचा दुसरा वाढदिवस साजरा केला. ज्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दिसत आहे की, लिटिल एंजेल मालतीने गुलाबी रंगाचा टॉप, लाल रंगाची पँट आणि हार्टच्या आकारचा गॉगल घातला आहे. या लूकमध्ये मालती खूपच क्युट दिसत आहे. तिची क्यूट स्टाइल लोकांना खूप आवडली. या फोटोंमध्ये मालती आणि निकची केमिस्ट्रीही पाहण्यासारखी आहे.

एका फोटोमध्ये मालती गॉगल घालून क्युट स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. दुसऱ्यामध्ये निक त्याच्या मुलीसोबत दिसत आहे. बर्थडे पार्टीच्या या फोटोंमध्ये प्रियांका आणि निकच्या फोटोंनीही लक्ष वेधून घेतलं. प्रियांकाने निकला मिठी मारल्याचा फोटो खूपच सु्ंदर आहे. याशिवाय जोनास ब्रदर्सचा फोटोही पाहायला मिळत आहे. हे फोटो पाहिल्यानंतर प्रियांका आणि निकच्या चाहत्यांनी मालतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

निक जोनासच्या पोस्टवर त्याच्या आणि प्रियांकाच्या चाहत्यांनी जोरदार कमेंट्स करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'हॅपी बर्थडे मालती. तू एक छोटी आणि सुंदर क्वीन आहेस.' दुसर्‍या युजरने लिहिले की, 'मालती एक सुंदर आणि गोड छोटी देवदूत आहे, जी तिच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला आनंदित करते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT