Nora Fatehi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi Deepfake: नोरा फतेही झाली डीपफेकची शिकार, व्हिडीओ पाहून अभिनेत्रीला बसला धक्का

Priya More

Nora Fatehi Deepfake Video:

एआयच्या मदतीने डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) बनवण्याचे प्रकार काही थांबायचे नाव घेत नाहीत. रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ, आलिया भट्ट, काजोल यांच्यानंतर आणखी एक अभिनेत्री डीपफेक व्हिडिओची शिकार झाली आहे. प्रसिद्ध डान्सर आणि बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची (Nora Fatehi) डीपफेक व्हिडीओ समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर नोरा फतेहीचा डीपफेक व्हिडिओ (Nora Fatehi Deepfake Video) तुफान व्हायरल होत आहे. नोरा फतेहीने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली असून हा व्हिडिओ पाहून मी आश्चर्यचकित झाल्याचे तिने सांगितले आहे.

नोरा फतेहीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. नोराने तिच्या डीपफेक व्हिडीओचा एक फोटो पोस्ट करत त्यावर असे लिहिले की, 'मला धक्का बसला आहे. ही मी नाही.' नोरा फतेही व्हायरल होणाऱ्या डीफफेक व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, नोरा एका प्रोडक्टची जाहिरात करताना दिसत आहे. नोरा फतेहीचा चेहरा वापरून एक डीपफेक व्हिडिओ बनवण्यात आला असून तो व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नोराला धक्का बसला आहे.

दरम्यान, नोव्हेंबर 2023 मध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेकची शिकार झाली होती. रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिली घटना होती. रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओमधील मुलगी ब्रिटिश-भारतीय वंशाची झारा पटेल होती. आरोपींनी झारा पटेलच्या बॉडीवर रश्मिका मंदान्नाचा चेहरा लावला होता. दिल्ली पोलिसांनी आंध्र प्रदेशातून रश्मिका मंदान्नाचा डीपफेक तयार करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. याआधी डिसेंबरमध्ये चार आरोपी पकडले होते. मात्र मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना आता यश आले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून डीपफेक व्हिडीओ (Deepfake Video) आणि फोटोंनी सर्वांचे टेन्शन वाढले आहे. बॉलिवूडपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींचे आतापर्यंत अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. डीपफेकचे शिकार झालेल्या सेलिब्रिटींमध्ये रश्मिका मंदान्ना, आलिया भट्ट, काजोल, सचिन तेंडुलकर, शुभमन गिल, सोनू सूद आणि आता नोरा फतेही यांच्या नावाचा समावेश आहे. या प्रकरणी आता सेलिब्रिटी देखील जागरुक झाले असून ते यावर उघडपणे भाष्य करताना दिसत आहेत. तसंच ते आपल्या चाहत्यांना याप्रकरणी जागरुक राहण्याचे आवाहन करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT