Actress Nargis Fakhri  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nargis Fakhri On Teachers Day: खरा शिक्षक कोण?, ' अभिनेत्री नर्गिस फाखरीने सांगितला नेमका अर्थ

Bollywood Actress Nargis Fakhri : बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाकरीने (Bollywood Actress Nargis Fakhri) शिक्षक दिनानिमित्त तिच्या खास व्यक्तीचे आभार मानले आहे.

Priya More

Teachers Day 2023:

आज शिक्षक दिन (Teachers Day 2023) असून संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला जात आहे. आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकांचे स्थान खूप महत्वाचे असते. एक चांगला व्यक्ती घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. बॉलिवूडच्या सेलिब्रिटी देखील आज शिक्षक दिन साजरा करत आपल्या आपल्या आवडत्या शिक्षकांना शुभेच्छा (Teachers Day Wishes) देत आहेत. अशामध्ये बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाकरीने (Bollywood Actress Nargis Fakhri) शिक्षक दिनानिमित्त तिच्या खास व्यक्तीचे आभार मानले आहे. याचसोबत तिने खरा शिक्षक कोण? याचा अर्थ समजून सांगितला आहे.

शिक्षक दिन साजरा करत असताना अभिनेत्री नर्गिस फाखरीने तिच्या आयुष्यातल्या खास व्यक्तींचे आभार मानते आहे. प्रत्येक माणूस आयुष्यात काहीना काही शिकवून जाते असे नर्गिसचे म्हणणे आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी आपल्याला शिकवत असताना नर्गिस तिला प्रेरणा देणाऱ्या लोकांचे आभार मानते आहे.

आयुष्यामध्ये प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींनी मला घडवलं असल्याचे नर्गिसने सांगितले. नर्गिस यावेळी खरा शिक्षक कोण याचा अर्थ समजावताना सांगितले की, 'जे लोक जीवनातील आव्हानांना तोंड देत पुढे सरकत राहतात, स्वतःला सर्वोत्तम बनण्यासाठी धडपडतात, दयाळूपणा दाखवतात आणि इतरांना मदतीचा हात पुढे करतात. तेच माझे खरे प्रेरणास्रोत आणि जीवनाचे खरे शिक्षक आहेत.'

तसंच, या जगात जिथे स्पॉटलाइट बर्‍याचदा ग्लिट्ज आणि ग्लॅमरवर चमकते. नर्गिस फाखरीचा प्रेरणांबद्दलचा दृष्टीकोन हा नक्कीच कमालीचा आहे. तिला तिचे गुरू केवळ मनोरंजन उद्योगातील व्यक्तींमध्येच सापडत नाहीत. तर ज्यांनी जीवनात तिला प्रत्येक क्षणी मदत केली ते तिचे खरे गुरु आहेत. दरम्यान, नर्गिस फाखरी ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT