Khushi Kapoor And Abrahim Ali Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Khushi Kapoor: 'द आर्चीज' रिलीज होताच खुशी कपूरच्या हाती नवा चित्रपट, सैफी अली खानच्या मुलासोबत करणार रोमान्स

Priya More

Khushi Kapoor Movie:

बॉलिवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर (Bony Kapoor) यांची धाकटी मुलगी खुशी कपूरने (Khushi Kapoor) नुकताच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिग्दर्शिका झोया अख्तरच्या 'द आर्चिज' (The Archies) या चित्रपटातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. खुशी कपूरचा पहिलाच चित्रपट 'द आर्चीज' 7 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला. खुशी कपूरच्या या चित्रपटाला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'द आर्चीज' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खुशी कपूरच्या हातात आणखी एक चित्रपट आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपट निर्माता करण जोहर खुशी कपूरसोबत चित्रपट तयार करण्याचा विचार करत आहे. या चित्रपटात खुशी कपूरसोबत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.

'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, करण जोहर एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट तयार करण्याचा विचार करत आहे. या चित्रपटात खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट थेट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल आणि निर्माते OTT प्लॅटफॉर्मशी चित्रपट स्ट्रीमिंग अधिकारांबाबत सध्या बोलत आहेत. खुशी आणि इब्राहिम यांच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शौना गौतमकडे आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होऊ शकते. या चित्रपटाचे टायटल अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान, शौना गौतम 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात सहयोगी दिग्दर्शक आणि 'संजू' चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून दिसली आहे. खुशी कपूरने 'द आर्चिज' चित्रपटातून डेब्यू केला आहे. त्याचबरोबर इब्राहिम अली खान चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या 'सरजमीन' चित्रपटातून पदार्पण करणार आहे. खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान यांचा हा दुसरा चित्रपट असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT