Janhvi Kapoor Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor Video: जान्हवी कपूरने शिखर पहाडिया आणि ओरीसोबत घेतलं तिरुपतीचं दर्शन, VIDEO व्हायरल

Janhvi Kapoor Visit Tirupati Temple: जान्हवी कपूरने आपल्या वाढदिवशी तिरुपती मंदिरात जाऊन दर्शन घेते. यावर्षी देखील तिने ही परंपरा कायम ठेवली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जान्हनी भगवान व्यंकटेशच्या दर्शनासाठी तिरुपतीला पोहोचली.

Priya More

Janhvi Kapoor Birthday:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) ६ मार्चला आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त जान्हवी कपूरने तिरुपती तिरुमला मंदिराला भेट दिली. यावेळी जान्हवी कपूरसोबत तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया (Shikhar Pahadia) आणि ओरी (Orry) दिसला. जान्हवीने यावेळी साऊथ इंडियन स्टाइलमध्ये ड्रेसिंग केली होती. जान्हवी कपूरचा तिरुपती मंदिर परिसरातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूरने आपल्या वाढदिवशी तिरुपती मंदिरात जाऊन दर्शन घेते. यावर्षी देखील तिने ही परंपरा कायम ठेवली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जान्हनी भगवान व्यंकटेशच्या दर्शनासाठी तिरुपतीला पोहोचली. तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आणि खास मित्र ओरहान अवत्रामणी उर्फ ​​ओरी याशिवाय तिची चुलत बहीण माहेश्वरीही तिच्यासोबत होती. जान्हवी कपूरचे तिरुपतीच्या दर्शनाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तिरुपतीच्या दर्शनासाठी पोहचलेली जान्हवी यावेळी दक्षिण भारतीय लूकमध्ये दिसली. यावेळी तिच्यासोबत फक्त शिखर पहाडियाच नव्हता तर ओरी देखील होते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जान्हवी कपूरने यावेळी मरून आणि लाल रंगाचा साऊथ इंडियन ड्रेस परिधान केला होता. तर शिखर आणि ओरीने ऑफ व्हाइट कलरची लुंगी घातली होती आणि खांदयावर त्याच रंगाची शाल घेतली आहे. यावेळी जान्हवी कपूर मंदिरात जमिनीवर डोकं टेकवून भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे दिसत आहे.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी वाढदिवसानिमित्त आपल्या मित्र परिवारासोबत जंगी पार्टी करतात. पण जान्हवी कपूरने वाढदिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेत आपला वाढदिवस साजरा केला. जान्हवीने तिच्या एका मुलाखतीत ती तिरुपती मंदिरामध्ये का जाते यामागचे कारण देखील सांगितले होते. जान्हवीच्या हृदयात या मंदिराचे विशेष स्थान आहे. खरं तर, श्रीदेवीही अनेकदा या मंदिरात जायची आणि जान्हवीलाही तिच्या आईची ही परंपरा पुढे चालू ठेवायची आहे असं म्हटलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT