Hazel Keech Donates Hair Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hazel Keech Donates Hair: युवराज सिंगच्या पत्नीनं उचललं मोठं पाऊल, हेझल कीचने दान केले केस; अभिनेत्रीनं असं का केलं?

Actress Hazel Keech: प्रग्नेंसीनंतर हेझलने मोठा निर्णय घेतला आणि आपले केस डोनेट केले. सध्या सोशल मीडियावर हेझलचे कौतुक केले जात आहे.

Priya More

Yuvaraj Singh Wife Hazel Keech:

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची (Yuvraj Singh Wife) पत्नी आणि अभिनेत्री हेझल कीच (Hazel Keech) ऑगस्ट २०२३ मध्ये दुसऱ्यांदा आई झाली. 'बॉडीगार्ड' फेम अभिनेत्रीच्या घरात चिमुकल्या परीचे आगमन झाले. युवराज आणि हेझलने आपल्या लाडक्या मुलीचे नाव ऑरा असे ठेवले.

दुसऱ्यांदा आई झाल्यामुळे चर्चेत असलेली हेझल सध्या एका चांगल्या कामामुळे चर्चेत आली आहे. प्रग्नेंसीनंतर हेझलने मोठा निर्णय घेतला आणि आपले केस डोनेट (Hazel Keech Donates Hair) केले. सध्या सोशल मीडियावर हेझलचे कौतुक केले जात आहे. या कामाद्वारे तिने सर्वांची मनं जिंकली आहेत.

प्रग्नेंसीनंतर हेझलच्या शरीरात अनेक बदल झाले. तिला हेअरफॉलची समस्या निर्माण झाली. जास्त प्रमाणात हेअरफॉल होत असल्यामुळे हेजलने आपले लांब केस कापले आणि एका ट्रस्टला डोनेट केले. हेजलने अलीकडेच प्रसूतीनंतर केस गळण्याच्या समस्येबद्दल सांगितले. युवराजच्या पत्नीने सांगितले की, प्रसूतीनंतर तिने केस कापण्याचा निर्णय घेतला. केस कापल्याचे फोटो शेअर करत कॅप्शनद्वारे हेजलने या महान कार्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेचा विषय ठरली आहे.

हेझल कीचने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर केस कापल्यानंतरचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्री तिचे छोटे केलेले केस फ्लॉंट करताना आणि कापलेले केस एका हातात पकडताना दिसत आहे. कॅन्सरच्या रुग्णांसाठी विग बनवण्यासाठी तिने आपले केस दान केल्याची माहिती हेजलने या पोस्टच्या कॅप्शनद्वारे दिली आहे. हेझलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी ठरवले होते की जेव्हा मी माझे केस छोटे करीन, तेव्हा कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या लोकांसाठी विग बनवण्यासाठी माझे केस दान करेन.'

हेझल पुढे म्हणाली की, 'माझ्या पतीचे शेअर केले होते की केमोथेरपी दरम्यान आपले सर्व केस, पापण्या आणि भुवयांचे केस गळून पडतात आणि त्याचा आपल्या आत्मसन्मानावर कसा परिणाम होतो.' हेझलचा पती माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला २०११ मध्ये कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. हेझल पुढे म्हणाली की, 'मी केस दान केले ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. कारण मला नाही वाटत की मी पहिल्यांदा जेव्हा केस कापले होते तेव्हा अशा गोष्टी केल्या होत्या.'

हेझलने या पोस्टमध्ये पुढे असे देखील लिहिले आहे की, 'कल्पना करा की आपण सलूनमध्ये जे लांब, सुंदर केसाचे दृश्य पाहतो त्याचा उपयोग एखाद्याचे आयुष्य थोडे चांगले करण्यासाठी केला जाऊ शकतो.' दरम्यान, हेझल कीच आणि युवराज सिंग यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्न केले. या कपलने जानेवारी २०२२ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे ओरियनचे स्वागत केले. त्यानंतर आता तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. सध्या युवराज आणि हेझलच्या घरी नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT