Deepika Padukone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Academy Museum Gala मध्ये दीपिका पदुकोणचा जलवा, इव्हेंटमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Deepika Padukone Participate Academy Museum Gala Event: दीपिका पदुकोणने पुन्हा एकदा आपल्या ग्लोबल अचिव्हमेंट्सच्या माध्यमातून देशाला अभिमान वाटाण्याची संधी मिळवून दिली आहे.

Priya More

Deepika Padukone:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या चांगलीच चर्चेत आहे. दीपिका पादुकोण लॉस एंजिल्समध्ये आयोजित अकादमी म्युझियम गालाच्या इव्हेंटमध्ये सहभागी झाली. अ‍ॅकेडमी म्युझियम गाला (Academy Museum Gala ) हा ऑस्कर नंतरचा जगातील दुसरा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. दीपिका पदुकोणने पुन्हा एकदा आपल्या ग्लोबल अचिव्हमेंट्सच्या माध्यमातून देशाला अभिमान वाटाण्याची संधी मिळवून दिली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला दीपिका पदुकोणने ऑस्करमध्ये भारतीय गाणं सादर करण्यासाठी स्टेजवर पाऊल ठेवून इतिहास रचला होता. तर आता 2023 च्या शेवटी तिने आजपर्यंतचे सर्वात मोठी आणि खास अशी कामगिरी केली आहे. सध्या तिचे सर्वस्तरावरून खूप कौतुक होत आहे. महत्वाचे म्हणजे अ‍ॅकेडमी म्युझियम गाला इव्हेंटच्या रेड कार्पेटवर दीपिका पदुकोणने जलवा दाखवला. ती खूपच सुंदर दिसत होती.

अ‍ॅकेडमी म्युझियम गालाच्या इव्हेंटमध्ये दीपिका जबरदस्त ड्रेसिंग स्टाइलमध्ये सहभागी झाली होती. दीपिकाने या इव्हेंटमध्ये नेव्ही ब्लू कलरचा वेलवेट गाऊन परिधान केला होता. रेड कार्पेटवर जाण्यापूर्वी दीपिकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले होते. या इव्हेंटमध्ये दीपिकाने फोटोग्राफर्सला एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या. या इव्हेटमध्ये सेलेना गोमेज, दुआ लीपा, नताली पोर्टमॅन, लुपिता न्योंगो, के ह्यू क्वान आणि मेरिल स्ट्रीप हे हॉलिवूड सेलिब्रिटी देखील सहभागी झाले होते. चाहत्यांना दीपिकाचा हा लूक प्रचंड आवडला. दीपिकाने पुन्हा एकदा इतक्या मोठ्या जागतिक व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व केल्याने सर्वांना अभिमान वाटत आहे.

दरम्यान, दीपिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दीपिका पदुकोणने 'जवान' आणि 'पठाण' या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत काम केले होते. या दोन्ही चित्रपटांनी जगभरात 2200 कोटींहून अधिक कमाई करून रेकॉर्ड तोडले आहेत. ती लवकरच 'फायटर' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती हृतिकसोबत काम करणार आहे.

याशिवाय दीपिका नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऐवढंच नाही तर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन चित्रपटामध्ये देखील ती दिसणार आहे. या चित्रपटात ती लेडी सुपर कॉपच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT