Alia Bhatt Insta Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Insta Post: 'फोटो, क्षण आणि आयुष्यभराची आठवण...' राष्ट्रीय पुरस्कार मिळताच आलिया भटची पोस्ट व्हायरल

Alia Bhat Receiving National Award: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आलियाला 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Priya More

National Film Award:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) सध्या तिला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे (National Film Award) चर्चेत आहे. आलिया भटवर सध्या सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. १७ ऑक्टोबरचा दिवस हा आलिया भटला तिच्या आयुष्यातील खास दिवस ठरला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आलियाला 'गंगूबाई काठियावाडी' (gangubai kathiawadi) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आलियासह तिच्या कुटुंबीयांना प्रचंड आनंद झाला. आलिया भटने हा आनंदाचा क्षण आणि त्याच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

आलियाने या खास दिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये आलिया या खास दिवसासाठी तयार झालेली दिसली. या फोटोंमध्ये कधी ती तिचा पती आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसली. आल्याने इन्स्टाग्रामवर या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारासोबत फोटो काढताना दिसत आहे. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि राष्ट्रपतींसोबत काढलेले फोटो यामध्ये आहेत.

आलियाने हे फोटो शेअर करताच काही वेळातच व्हायरल झाले. हे फोटो शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले - 'फोटो... क्षण आणि आयुष्यभराची आठवण.' या फोटोंपैकी आलियाने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ३ राष्ट्रीय विजेते कॅमेऱ्यात एकत्र पोज देताना दिसत आहेत. आलियाशिवाय क्रिती सेनॉन आणि अल्लू अर्जुन या फोटोमध्ये दिसत आहेत.

आलियाच्या या फोटोंवर तिची सासूबाई नीतू कपूरने कमेंट केली आहे. नीतू यांनी आलियाच्या फोटोंवर हार्ट आयकॉन शेअर केला आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेल्या आलियाने या खासप्रसंगी तिच्या लग्नाची साडी नेसली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलियाच्या या साडीची किंमत जवळपास ५० लाख रुपये आहे. यावेळी तिला प्रोत्साहन देण्यासाठी पती आणि अभिनेता रणबीर कपूर आलियासोबत पोहोचला. आलिया भट्ट पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर पोहोचताच रणबीर फोनचा कॅमेरा ऑन करून हा सुंदर क्षण टिपताना दिसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT