Ada Sharma Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adah Sharma: अदा शर्माचा १५ रुपयांच्या साडीमध्ये स्टनिंग लूक, VIDEO पाहून चाहते झाले आश्चर्यचकीत

Adah Sharma Wear 15 Rs Saree: कधी साडी, कधी ड्रेस तर कधी वेस्टर्न वेअरमध्ये अदा शर्मा दिसते. आता अदा शर्मा आपल्या ड्रेसिंगमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. अदा शर्माचा साडी नेसलेला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Ada Sharma Video:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्मा (Ada Sharma) या नाही तर त्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी चित्रपट तर कधी आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे अदा शर्मा चर्चेत राहते. प्रत्येक इव्हेंटला अदा शर्मा नेहमी सुंदर आऊटफिटमध्ये जाते. कधी साडी, कधी ड्रेस तर कधी वेस्टर्न वेअरमध्ये अदा शर्मा दिसते. आता अदा शर्मा आपल्या ड्रेसिंगमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. अदा शर्माचा साडी नेसलेला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अदा शर्माच्या या साडीची किंमत ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अदा शर्माने ही साडी तिच्या आजीची नेसली आहे.

'द केरळ स्टोरी' चित्रपटामुळे अदा शर्माला चांगली प्रसिद्ध मिळाली. या चित्रपटानंतर अदा शर्माने अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. अदा शर्मा नुकताच 'बस्तर- द नक्सल स्टोरी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटाने बऱ्यापैकी कमाई केली. या चित्रपटानंतर अदा शर्माचे चाहते तिच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. अशामध्ये आता अदा शर्माचा नुकताच साडीमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अदा शर्माला पाराराझींनी एका कॅफेबाहेर स्पॉट केले. जेव्हा पाराराझींनी तिला साडी खूप सुंदर आहे असे म्हणत तिची किंमत विचारली. तर अदाने ही साडी १५ रुपयांची असल्याचे सांगितले. पापाराझी साडीची किंमत ऐकून शॉक झाले. त्यानंतर अदा पुन्हा त्यांना साडीची किंमत १५ रुपये असल्याचे सांगते. हा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

अदा शर्माने सांगितले की, ही साडी तिला तिच्या आजीने भेट दिली होती. काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीच्या आजीने ही साडी विकत घेतली होती. फक्त 15 रुपयांत ही साडी मिळाली होती. अदा म्हणते की, 'आजीने तिला साडी भेट म्हणून दिली आहे, तिची किंमत करोडोंमध्ये आहे.' व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अदा शर्माने लाइट ऑरेंजसह मल्टिकलरची साडी नेसली आहे. केसाला क्पिल, ब्लॅक कलरचा गॉगल, स्पोर्ट्स शूट घालून अदाने आपला लूक परिपूर्ण केला आहे. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

अदा शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्याच्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'आजीच्या काळात एका साडीची किंमत फक्त १५ रुपये असायची.' तर काही नेटकऱ्यांनी अदा शर्माला ही साडी नेमकी कुठून घेतली अशाप्रकारचे देखील प्रश्न विचारले आहेत. अदा शर्माच्या साडीच्या किमतीवर विश्वास ठेवणे अनेकांना कठीण झाले आहे. सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Flood: गडचिरोलीत पावसाचा कहर; २५ प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

SCROLL FOR NEXT