Vivek Oberoi On Sushant Singh Rajput Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushant Singh Rajput ने जे केलं ते करण्याचा विचार मी पण केला होता, Vivek Oberoi ने सांगितला कठीण काळातला अनुभव

Vivek Oberoi On Sushant Singh Rajput: विवेक ऑबेरॉय अनेकदा त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत असतो. बऱ्याचदा तो आपल्या पर्सनल लाइफशी संबंधित अनेक गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

Priya More

Vivek Oberoi:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) बऱ्याच वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जात. विवेक ओबेरॉयने अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून त्याचा एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्याचा बॉलिवूडमधील प्रवास खूपच खडतर होता.

विवेक ओबेरॉय सध्या 'इंडियन पोलिस फोर्स' (Indian Police Force) या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला.या वेबसीरिजमध्ये त्याने शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केले आहे. यासोबतच तो रियालिटी शोमध्ये अनेकदा जजच्या भूमिकेमध्ये दिसतो. विवेक ऑबेरॉय अनेकदा त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत असतो. बऱ्याचदा तो आपल्या पर्सनल लाइफशी संबंधित अनेक गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आयुष्यातल्या कठीण काळाचा कशापद्धतीने सामना केला हे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

विवेक ओबेरॉयने नुकताच एका मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील आव्हानांबद्दल सांगितले. तो त्याच्या आयुष्यातील कठीण टप्प्यातून यशस्वीरित्या पार पडला आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी नुकत्याच झालेल्या संवादादरम्यान विवेक ओबेरॉयला मानसिक आरोग्य समस्यांशी सामना करण्याचा अनुभव आणि त्यावर मात कशी करता आली याबद्दल प्रश्न विचारण्यात आलाहोता. यावर उत्तर देताना विवेक ओबेरॉयने सांगितले की, 'मी माझ्या आयुष्यात अंधाराच्या काठावर होतो. सुशांतने जे केले तेच करण्याचा विचारही मी केला होता. जेव्हा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सर्वकाही चुकीचे होऊ लागते तेव्हा असे घडते.'

विवेक ओबेरॉयने पुढे सांगितले की, 'जेव्हा एखादी व्यक्ती त्या टप्प्यावर असते, तेव्हा मनाने लवकर पुढे जाण्यातच शहाणपणा असतो. आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्यांना किती वेदना आणि दुःख सहन करावे लागते याचा विचार केला पाहिजे. अशा परिस्थितीत मी स्वत:ला भाग्यवान समजत होतो की मला एक चांगले घर आणि कुटुंब आहे. ज्यांनी मला त्या क्षणांमध्ये साथ दिली.'

भावुक होत विवेकने पुढे सांगितले, 'मी जमिनीवर बसलो. लहान मुलाप्रमाणे मी आईच्या कुशीत डोकं ठेऊन रडलो आणि विचारले होते की माझ्यासोबत असं का होतंय?' मी ४० मिनिटे रडत राहिलो आणि मग आईने मला विचारले, 'जेव्हा तू पुरस्कार जिंकत होतास, तुझे कौतुक होत होते, तुला प्रेम मिळत होते, मग तू तेव्हा देवाला का नाही विचारले की 'मीच का?'आईच्या त्या बोलण्याने माझे डोळे उघडले.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

SCROLL FOR NEXT