Yodha Day 5 Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yodha Box Office Collection Day 5: 'योद्धा'चा कमाईचा वेग घसरला, आतापर्यंत किती केले कलेक्शन?

Sidharth Malhotra And Disha Patani: हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करताना दिसत नाहीये. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशजनक ओपनिंग केली. या चित्रपटाला पहिल्या विकेंडला देखील चांगली कमाई करता आली नाही.

Priya More

Yodha Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Shidharth Malhotra) सध्या त्याचा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'योद्धा' चित्रपटामुळे (Yodha Movie) चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करताना दिसत नाहीये. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशजनक ओपनिंग केली. या चित्रपटाला पहिल्या विकेंडला देखील चांगली कमाई करता आली नाही. बिग बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यामध्ये मंगळवारी देखील घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धा चित्रपटाला मंगळवारी चांगली कमाई करणं देखील कठीण गेले. रिलीजच्या पाचव्या दिवशी चित्रपटाला मोठा धक्का बसला. प्रदीर्घ कालावधीनंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा प्रवास सुरुवातीलाच कठीण झाला आहे. 'योद्धा'चे प्रदर्शन बरेच दिवसांपासून पुढे ढकलले जात होते. बऱ्याच बदलांनंतर 'योद्धा' अखेर मागच्या आठवड्यात म्हणजे शुक्रवारी रिलीज झाला.

सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा'ने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक ओपनिंग केली होती. प्रचंड बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४ कोटींची कमाई केली होती. योद्धाने बॉक्स ऑफिसवर शनिवारी 5.75 कोटी आणि रविवारी सुमारे 7 कोटींची कमाई केली. चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला अंदाजे 16 कोटींची कमाई केली. सोमवारी चित्रपटाने फक्त 2.15 कोटींची कामाई केली.

'योद्धा'च्या मंगळवारच्या कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटाने पुन्हा एकदा निराशा केली. या चित्रपटाने 19 मार्चला म्हणजे मंगळवारी फक्त 2.30 कोटी रुपयांची कमाई केली. यासह 'योद्धा'ने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जवळपास 21.30 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या बजेटपेक्षा ही कमाई खूपच कमी आहे.

दरम्यान, 'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिशा पटानी आणि राशि खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी केले आहे. तर करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. 'योद्धा' या ॲक्शन ड्रामा चित्रपटात प्लेन हायजॅकची कथा दाखवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT