Yodha Movie Tease Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sidharth Malhotra आणि Disha Patani च्या 'योद्धा'ची धमाकेदार टीझर आऊट

Yodha Movie Tease Out: 'योद्धा' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. फाइटिंग- अॅक्शनने भरलेला योद्धाचा टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सध्या या चित्रपटाची चांगीलच चर्चा होत आहे.

Priya More

Siddharth Malhotra And Disha Patani :

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि दिशा पाटनी (Disha Patani) सध्या त्यांच्या आगामी 'योद्धा' चित्रपटामुळे (Yodha Movie) चांगलेच चर्चेत आहे. दोघांचेही चाहते त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. फाइटिंग- अॅक्शनने भरलेला योद्धाचा टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या टीझरपूर्वी चित्रपटाचे पोस्टर हवेमध्ये रिलीज करण्यात आले होते. यासोबतच टीझरच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली. या पोस्टर रिलीजने इतिहास रचला कारण ते 13,000 फूट उंचीवर हवेत फडकवले गेले होते. याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. त्या व्हिडिओमध्ये पोस्टर लाँच करण्यासाठी टीम दुबईमध्ये स्कायडायव्हिंग करताना दिसली.

योद्धाच्या टीझरची सुरूवात विमानाच्या हायजॅकच्या सीनने होते. त्यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडते. या टीझरला व्हॉईसओवर ऐकू येतो की, 'लेडीज अँड जँटलमॅन, या विमानात आठ आपत्कालीन दरवाजे आहेत आणि जर कोणाला यामधून पडायचे नसेल तर सीट बेल्ट बांधा आणि बसून राहा, कारण पुढे वादळ येण्याची शक्यता आहे.'

व्हॉईसओव्हरसह विमान हायजॅक आणि सरकारी कार्यालयातील गोंधळाची दृश्ये टीझरमध्ये दिसत आहेत. मग सिद्धार्थ मल्होत्रा ​​डॅशिंग स्टाईलमध्ये कमांडोच्या रूपात एन्ट्री करतो आणि त्यानंतर अभिनेता पळताना दिसतो. तो फायटिंग करत शत्रूंना घाम फोडताना दिसतो.

'योद्धा'च्या टीझरमध्ये एकीकडे सिद्धार्थ मल्होत्रा ​​दहशतवाद्यांसोबत जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहे. दिशा पटानी या चित्रपटामध्ये एअर होस्टेसच्या भूमिकेमध्ये असल्याचे टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. पण तिची एक झलक इतकी जबरदस्त आहे की तिला पाहून सर्वजण चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. करण जोहरच्या योद्धा चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशि खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, योधा फिल्म धर्मा प्रोडक्शनची पहिली एरियल ॲक्शन फ्रँचायझी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT