Shreyas Talpade Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade: 'मी मेलोच होतो, पण डॉक्टरांनी...', हार्ट अ‍टॅकच्या २० दिवसांनंतर श्रेयस तळपदेने सांगितला तो भयानक क्षण

Shreyas Talpade First Reaction On Heart Attack: 'माझ्या हृदयाची धडधड १० मिनिटं थांबल्यामुळे डॉक्टरांनी मला वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केले होते.', असे श्रेयस तळपदेने सांगितले.

Priya More

Shreyas Talpade On Heart Attack:

बॉलीवूड (Bollywood) अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) १४ डिसेंबर २०२३ ला 'वेलकम 3'च्या (Welcome 3 Movie) शूटिंगनंतर हार्ट अ‍टॅक (Heart Attack) आला होता. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. मात्र डॉक्टरांच्या मेहनतीमुळे आणि नशिबाच्या जोरावर त्याने मृत्यूवर मात केली. श्रेयसला हार्ट अ‍टॅक आल्यामुळे त्याच्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. श्रेयस आता बरा झाला असून त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

हार्ट अ‍टॅकच्या २० दिवसानंतर श्रेयस तळपदे पहिल्यांदाच त्या भयानक क्षणाबद्दल बोलला आहे. 'माझ्या हृदयाची धडधड १० मिनिटं थांबल्यामुळे डॉक्टरांनी मला वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केले होते.', असे श्रेयस तळपदेने सांगितले. तसंच, श्रेयस तळपदेच्या कुटुंबात हृदयाशी संबंधित आजारांचा इतिहास असल्याचेही समोर आले आहे.

'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस तळपदेने हार्ट अ‍टॅकविषयी पहिल्यांदाच बोलला. मृत्यूच्या जबड्यातून परतलेला अभिनेता श्रेयस तळपदेने सांगितले की, 'मी आयुष्यात कधीही हॉस्पिटलमध्ये दाखल झालो नाही. कधीही फ्रॅक्चर झाले नाही. पण हृदयविकाराच्या झटक्याने सगळंच बदलून गेलं. त्यामुळेच आरोग्याशी खेळू नका असे म्हणतात. जीवन असेल तर जग आहे...'

श्रेयस तळपदे आता बरा झाला आहे. घरी परतल्यानंतर श्रेयस तळपदेने 'बॉम्बे टाइम्स'ला मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सांगितला. श्रेयस तळपदे म्हणाला की, 'माझा जीव गुदमरत होता. माझी डावी बाजू वेदनेने थरथर कापू लागली होती. मोठ्या कष्टाने मी माझी व्हॅनिटी व्हॅन गाठली आणि कसे तरी कपडे बदलले. मला माझ्या स्नायूंमध्ये वेदना जाणवत होत्या. मी यापूर्वी असे काहीही अनुभवले नव्हते. मी ताबडतोब घरी गेलो आणि पुढच्या १० मिनिटांत माझी पत्नी मला दवाखान्यात घेऊन गेली.'

श्रेयस तळपदेने पुढे सांगितले की, 'रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर माझी प्रकृती पाहून डॉक्टरांनी तातडीने इमर्जन्सी उपचार सुरू केले. सीपीआरनंतर मला शॉकही देण्यात आले. काही मिनिटांसाठी मी वैद्यकीयदृष्ट्या मृत होतो. कसे तरी डॉक्टरांनी ला पुन्हा जिवंत केले. मी याला माझा दुसरा जन्म मानतो. हा एक मोठा हार्ट अ‍टॅक होता आणि त्यावर त्वरित उपचार केले नसते तर मला पुन्हा श्वास घेता आला नसता.'

यावेळी श्रेयसने त्याच्या मदतीसाठी धावून आलेल्यांचे आभार मानले. त्याचसोबत त्याने पुनर्जन्माचे श्रेय पत्नीला म्हणजे दिप्तीला दिले आहे. श्रेयसने असं देखील सांगितले की, 'तो २० व्या वर्षांपासून काम करत आहे. आता तो ४७ वर्षांचा आहे. दारू आणि सिगारेटलाही हात लावत नाही. या निरोगी जीवनशैलीनेच मला हा धक्का सहन करण्यास मदत केली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT