मनोरंजन बातम्या

HC Notice To Shah Rukh-Akshay-Ajay: किंग खानसह अक्षय कुमार आणि अजय देवगणला हायकोर्टाची नोटीस, नेमकं कारण काय?

Shah Rukh Khan, Ajay Devgn And Akshay Kumar: पान मसाला कंपन्यांच्या (Paan Masala Company) जाहिराती प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे हे तिन्ही अभिनेते सध्या चर्चेत आले आहेत.

Priya More

Paan Masala Advertisement:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात शाहरुख खानसह (Shah Rukh Khan) सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अजय देवगण (Ajay Devgn) सध्या अडचणीत आले आहेत. या तिन्ही अभिनेत्यांना हायकोर्टाने (High Cout) नोटीस बजावली आहे.

शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने नोटीस बजावली आहे. पान मसाला कंपन्यांच्या (Paan Masala Company) जाहिराती प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे हे तिन्ही अभिनेते सध्या चर्चेत आले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवमान याचिकेला उत्तर देताना, केंद्र सरकारने अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाला कळवले की त्यांनी अभिनेते अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यावर गुटखा कंपन्यांच्या सहभागाबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनाही त्यांनी केलेल्या जाहिरातीप्रकरणी नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.

सध्या सुप्रीम कोर्टात देखील याच मुद्द्यावर सुनावणी सुरू आहे. अशा परिस्थितीत याचिका तातडीने फेटाळण्यात यावी, अशी माहिती केंद्राच्या वकिलांनी शुक्रवारी हायकोर्टाला दिली. युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने ९ मे २०२४ रोजी सुनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने यापूर्वी केंद्र सरकारला याचिकाकर्त्याच्या प्रतिनिधीत्वावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. ज्यांनी मुळात अभिनेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे असा युक्तिवाद केला होता. ज्यांना उच्च प्रोफाइल पुरस्कार देण्यात आले होते परंतू तेच गुटखा कंपन्यांसाठी जाहिरात करत होते.

याचिकाकर्त्याने सुनावणीदरम्यान सांगितले की, २२ ऑक्टोबर रोजी काही व्यक्तींनी या अभिनेत्यांच्या वतीने सरकारसमोर आपले म्हणणे मांडले. परंतु या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर अवमान याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांना नोटीस बजावली होती. शुक्रवारी डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी हायकोर्टात सांगितले की, केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

SCROLL FOR NEXT