Salman Khan Angry On Paparazzi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Video: 'सर्वांनी मागे व्हा', सोहेल खानच्या बर्थडे पार्टीनंतर भाईजान का संतापला?; व्हिडीओ होतोय व्हायरल

Salman Khan Angry On Paparazzi: भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सलमान खान (Salman Khan) संपूर्ण कुटुंबासोबत आलेला होता. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Sohail Khan Birthday:

बॉलिवूड अभिनेता सोहेल खानचा (Sohail Khan Birthday) आज आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. मंगळवारी रात्री सोहेल खानच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सलमान खान (Salman Khan) संपूर्ण कुटुंबासोबत आलेला होता. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी सलमान खान पापाराझींवर चांगलाच संतापलेला दिसला. यावेळी 'मागे व्हा सर्वांनी' असं तो पापाराझींना म्हणतो.

सोहेल खानच्या बर्थडे पार्टीनिमित्त मंगळवारी रात्री सलमान खानचे संपूर्ण कुटुंब एकत्र आलेले दिसले. सगळ्यांनी मिळून धाकटा भाऊ सोहेलचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. सलमान खान व्यतिरिक्त या बर्थडे पार्टीला वडील सलीम खान, आई सलमा, अर्पिता, आयुष, अलविरा, अतुल अग्निहोत्री आणि काही जवळचा मित्र परिवार उपस्थित होता.

यावेळी पार्टीतून बाहेर आल्यानंतर पापाराझींनी फोटो काढण्यासाठी मोठ गर्दी केली. सलमान खानच्या घरातील सर्व सदस्य कॅमेऱ्यासमोर आनंदाने पोज देत असताना सलमान खान अचानक रागावलेला दिसत होता. सलमानचे फोटो काढण्यासाठी पापाराझींनी त्याच्या कारला घेराव घालला. त्यामुळे सलमान खान फोटोग्राफर्सवर संतापला. सर्वांनी मागे व्हा असं तो संतप्त होत पापाराझींना म्हणाला.

सलमान खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सनी कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'हा भाऊ गाडी चालवत नाही हे बरे झाले.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'बोलायचीही गरज नव्हती, त्यांना फक्त रागावलेले डोळे दाखवायचे होते.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'हे तर डोळे पाहून घाबरत आहेत.' तर आणखी एकाने लिहिले की, 'टायगर 3 फ्लॉप झाल्यामुळे बिचारा शॉकमध्ये आहे.'

दरम्यान, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी अलीकडेच सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे. लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता आणि गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील घरावर हल्ला केला होता. सलमान खानसोबतच्या त्यांच्या जवळकीचे कारण देत त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमानची सुरक्षा वाढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT