Ranveer Singh On Orry Saam Tv
मनोरंजन बातम्या

Orry सोबत फोटो नाही काढला तर काय होतं?, Ranveer Singh ने सांगितलं कारण; VIDEO चर्चेत

Ranveer Singh On Orry: स्वत: ओरीने हा मजेशीर व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सर्वात आधी रणवीर सिंग म्हणतोय की, 'ओरी नेमकं काय करतो हे आजपर्यंत मला समजले नाही.'

Priya More

Ranveer Singh Video:

बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींची पार्टी असो वा लग्न त्यामध्ये एका व्यक्तीची नेहमीच चर्चा होत असते. ती व्यक्ती म्हणजे ओरी. ओरीशिवाय (Orry) त्यांची पार्टी अपूर्णच असते. बॉलिवूडमधील प्रत्येक सेलिब्रिटींसोबत ओरीचं एक खास नातं आहे. ओरी या सेलिब्रिटींसोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो.

नुकताच जामनगरमध्ये पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये (Anant Ambani And Radhika Merchant Pre-Wedding) ओरीने हजेरी लावली होती. या फंक्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ओरीने देखील या फंक्शनमध्ये इतर सेलिब्रिटींसोबत खूप धम्माल केली. यावेळी रणवीर सिंगने ओरीची चांगलीच खिल्ली उडवली आहे. त्यासोबत ओरीसोबत फोटो काढला नाही तर काय होते यामागचे कारण त्याने सांगितले आहे.

स्वत: ओरीने हा मजेशीर व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सर्वात आधी रणवीर सिंग म्हणतोय की, 'ओरी नेमकं काय करतो हे आजपर्यंत मला समजले नाही.' रणवीर पुढे म्हणतो की, 'ओरी हा एक केस स्टडी आहे.' त्यानंतर अर्जुन कपूर म्हणतो की, 'ओरी लिव्हर आहे.' त्यानंतर रणवीर देखील म्हणतो की, 'प्रत्यक्षात ओरी एक लिव्हर आहे.' त्यानंतर रणवीर म्हणतो की, 'दोन किडनी आहेत.'

यानंतर रणवीरने ओरीच्या पोझबाबत काही गोष्टी सांगितल्या. रणवीर सिंग पुढे सांगतो की,'जर ओरीने तुम्हाला अशाप्रकारे स्पर्श केला आणि त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला तर याचा अर्थ तुम्ही त्याच्या जवळ आहात आणि जर तसे नसेल तर याचा अर्थ तुम्हाला आणखी काम करण्याची गरज आहे.' त्यानंतर मध्येच ओरी रणवीरला अडवतो आणि म्हणतो की, 'जितका जास्त स्पर्श कराल तितका अधिक फायदा होईल.' यानंतर सर्वजण जोरजोरात हसू लागतात.

हा व्हिडिओ शेअर करत ओरीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रणवीर सिंग माझ्या टच सिस्टममागील कारण सांगत आहे. ज्यामध्ये स्कोअरिंग सिस्टमही जोडलेली आहे.' ओरी आणि रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी जोरदार कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, 'तो काय करत आहे हे कोणालाच माहीत नाही पण तो काहीतरी करत आहेत.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'आता तुमच्या हाताच्या हालचालींवर लक्ष ठेवतील.' तिसऱ्या युजरने लिहिले की,'इतक्या सुंदर मुलाचा कोणी द्वेष कसा करू शकतो?'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT