Mithun Chakraborty  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mithun Chakraborty : मोठी बातमी! मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्ती यांना ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार दिला जाणार आहे.

Ruchika Jadhav

मनोरंजन विश्वातून महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मिथुन चक्रवर्ती यांना ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार दिला जाणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील मिथुन चक्रवर्ती यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येत असल्याचं निवड समितीने म्हटलं आहे. हा पुरस्कार ८ ऑक्टोबर रोजी मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हिंदी सिनेविश्वात मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक असे हिट चित्रपट केले आहेत. विनोदाचं अचूक टायमींग आणि त्यांच्या डान्स स्टेप्सचे आजही लाखो चाहते आहेत. बॉलिवूडच्या कामगिरीत त्यांचं महत्वाचं योगदान आहे. त्यामुळेच आज त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती सांगितली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "कोलकाताच्या रस्त्यांपासून ते चित्रपटांच्या विश्वात उंची गाठून मिथुनदा यांनी सध्याच्या आणि या पुढच्या पिढीला इन्स्पायर केलं आहे. ही घोषणा करताना मला फार आनंद होत आहे की, दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटांत दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिथुन चक्रवर्ती यांना आजही अनेक व्यक्ती डिस्को डान्सर म्हणूनच ओळखतात. १९८२ मध्ये त्यांचा डिस्को डान्सर हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. यामधील गाणी आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की, सर्वत्र त्यांना डिस्को डान्सर म्हणून ओळखलं जाऊ लगालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विदर्भात मोठी राजकीय घडामोड, काँग्रेसला खिंडार; २२१ पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

De De Pyaar De 2 Collection : अजय देवगणचा 'दे दे प्यार दे 2' सिनेमा 50 कोटींच्या उंबरठ्यावर, मंगळवारी कमाई किती?

Maharashtra Government: गुंठेधारकांसाठी खुशखबर! आता सातबाऱ्यावर नाव लागणार; सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: पुण्यात संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप राहणार बंद

Eknath Shinde News : ठाणेकरांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सवलत, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT