Showtime Webseries Saam Tv
मनोरंजन बातम्या

Showtime Web Series: 'शो टाईम'मधील शशांक केतकरच्या अभिनयाचे कौतुक, इमरान हाश्मीसोबत केलंय काम

Shashank Ketkar Web Series Showtime: इमरान हाश्मीसोबत (Emraan Hashmi) तो स्क्रीन शेअर करणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर आज ही वेब सीरिज स्ट्रीम झाली . या वेबसीरिजच्या माध्यमतून बॉलिवूड विश्व आणि त्याची अनोखी दुनिया यातून बघायला मिळणार आहे.

Priya More

Shashank Ketkar Web Series:

मराठमोळा अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. मालिका, वेब शो आणि चित्रपटात तो आजवर आपल्याला दिसला आहे. शशांक लवकरच 'शो टाईम' (Showtime Webseries) या नव्या कोऱ्या वेब सीरिजमध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत दिसणार आहे.

इमरान हाश्मीसोबत (Emraan Hashmi) तो स्क्रीन शेअर करणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर आज ही वेब सीरिज स्ट्रीम झाली . या वेबसीरिजच्या माध्यमतून बॉलिवूड विश्व आणि त्याची अनोखी दुनिया यातून बघायला मिळणार आहे. शशांक केतकर यात काय भूमिका साकारणार आहे हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

शशांक केतकरने याआधी सुद्धा हिंदी वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली होती. आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज होत आहे. शशांक केतकरची भूमिका ही नक्कीच वेगळी असणार यात शंका नाही. शो टाईममध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची वर्णी असून शशांक केतकर या मोठ्या कलाकारांसोबत झळकणार आहे. इमरान हाश्मी, मौनी रॉयसह अनेक बॉलिवूड कलाकार शो टाईममध्ये दिसणार आहे. तर शशांक केतकर सारखा मराठमोळा चेहरा या वेबसीरिजमध्ये बघायला मिळणार आहे.

बॉलिवूड जग जितकं ग्लॅमरस आणि चकचकीत दिसतं. तितकाच त्यामागे अंधारही आहे. हे अनेक वेळा लोकांनी अनेक प्रकारे सांगितले आणि ऐकले आहे. निर्माते-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ग्लॅमर इंडस्ट्रीचे हे काळे सत्य त्यांच्या 'पेज 3', 'फॅशन' आणि 'हिरोईन' यासारख्या चित्रपटांतून दाखवले आहे. त्याचवेळी, आता निर्माता करण जोहरने ओटीटीवर 'शो टाइम' या वेब सीरिजच्या रूपात 8 एपिसोडमध्ये हे कटू सत्य समोर आणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT