Arbaaz Khan Giorgia Andriani  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arbaaz Khan: ब्रेकअपनंतर ५६ वर्षांचा अरबाज खान पुन्हा पडला प्रेमात; मलायका, जॉर्जियानंतर 'या' सुंदरीत अडकला जीव

Priya More

Arbaaz Khan New Girlfriend:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) छोटा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) सध्या आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. अरबाज खानचा जॉर्जिया एंड्रियानीसोबत (Georgia Andriani) ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अरबाज खानला आता नवं प्रेम मिळालं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अरबाज खान लवकरच दुसरं लग्न करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

५६ वर्षांचा अरबाज खान पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, अरबाज खान यावेळी कोणत्याही अभिनेत्रीच्या प्रेमात पडला नाही. तर तो एका मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात पडला आहे. या मेकअप आर्टिस्टचे नाव शौरा खान आहे. अरबाज आणि शौरा एकमेकांच्या प्रेमात खूपच सिरिअस असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही आपलं नांत पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

अरबाज खान आपली लेडीलव्ह शौरा खानसोबत लग्न करण्याचा विचार करत आहे. दोघांकडून देखील लग्नासाठी प्रयत्न सुरू आहेत. अरबाज आणि शौराचं लग्न हे इंटीमेट वेडिंग असेल. या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित राहतील. अरबाज आणि शौराच्या अफेरबाबतच्या चर्चा खऱ्या असल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे.

अरबाज आणि शौराची भेट त्याचा आगामी चित्रपट 'पटना शुक्ला'च्या सेटवर झाली असल्याचे सांगितले जात आहे. आधी मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. अरबाजचा हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शौरा खान ही प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. ती अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशासाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते.

दरम्यान, अरबाज खानने १९९८ मध्ये अभिनेत्री मलायका अरोरासोबत लग्न केले होते. १९ वर्षानंतर हे दोघं वेगळे झाले. ११ मे २०१७ मध्ये अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेतला. मलायकासोबत वेगळं झाल्यानंतर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. २०१९ मध्ये त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. पण मागच्यावर्षी या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या. तेव्हा जॉर्जियाने एका मुलाखतीमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा खऱ्या असल्याचे सांगितले. जॉर्जियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता अरबाजला तिसरं प्रेम मिळालं असून लवकरच तो लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

SCROLL FOR NEXT