Apoorva Shukla Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Apoorva Shukla Death: डिप्रेशनमुळे 35 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्याचा मृत्यू, अजय देवगण-बिग बींसोबत केलंय काम

Actor Apoorva Shukla: अपूर्व शुक्लाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपटांव्यतिरिक्त अपूर्व शुक्लाने टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते. वडिलांच्या निधनानंतर अपूर्व डिप्रेशनमध्ये गेला होता.

Priya More

Bollywood News:

बॉलिवूडमधून (Bollywood) एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता अपूर्व शुक्ला (Apoorva Shukla) यांचे निधन झाले आहे. २० डिसेंबरला अभिनेत्याचा भोपाळ येथील हमीदिया रुग्णालय परिसरात मृत्यू झाला. अपूर्व शुक्ला डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. तो रुग्णालय परिसरातील रात्रीच्या निवारागृहात राहत होता. अपूर्व शुक्लाने बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते.

पोलिसांनी सांगितले की, २० डिसेंबर रोजी रात्रीच्या निवारागृहात राहणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांना मृत अपूर्व शुक्लाच्या खिशातून एक चिठ्ठी सापडली. ज्यावर एक फोन नंबर लिहिलेला होता. त्या नंबरवर पोलिसांनी कॉल केल्यावर ती अपूर्व शुक्लाची मावशी असल्याचे आणि मृताचे नाव अपूर्व शुक्ला असल्याचे उघड झाले. अभिनेत्याच्या मावशीने सांगितले की, अपूर्व शुक्ला हा बऱ्याच काळापासून नैराश्याने त्रस्त होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते.'

अपूर्व शुक्लाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपटांव्यतिरिक्त अपूर्व शुक्लाने टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते. वडिलांच्या निधनानंतर अपूर्व डिप्रेशनमध्ये गेला होता. अपूर्वा शुक्ला आधी वडील पंकज शुक्ला आणि आई इंदिरा शुक्ला यांच्यासोबत जहांगीराबादच्या अहिर भागामध्ये राहत होता. पण नंतर तो घर सोडून रात्रीच्या निवारागृहात राहू लागला होता.

दरम्यान, अपूर्व शुक्लाने 'चक्रव्यूह', 'सत्याग्रह', 'जय गंगाजल' आणि 'तबादला' अशा काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच त्याने झी टीव्ही आणि सोनीच्या अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. अपूर्व शुक्लाने बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलीसाठी राजकीय दबाव टाकल्याने महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्याचे निलंबन

Pub Fire: मध्यरात्री पबमध्ये अग्नितांडव, भीषण आगीमध्ये होरपळून २७ जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Blood Sugar : रोज कॉफी सेवन केल्याने शुगरवर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Rain Alert: पुन्हा पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT