Anil Kapoor Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor Video: अनिल कपूरने भर कार्यक्रमात महेश बाबूचा केला अपमान, VIDEO पाहून त्याचे चाहते संतापले

Anil Kapoor And Mahesh Babu Video: अनिल कपूर (Anil Kapoor) साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत (Mahesh Babu) असा काही वागला ज्यामुळे त्याला सध्या ट्रोल केले जात आहे.

Priya More

Animal Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कमालीची वाढली आहे. सध्या या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे.

नुकताच हैदराबादमध्ये या चित्रपटाचा प्री-रिलीज कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. यादरम्यान अनिल कपूर (Anil Kapoor) साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत (Mahesh Babu) असा काही वागला ज्यामुळे त्याला सध्या ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल स्टेजवर दिसत आहेत. अनिल स्टेजसमोर बसलेल्या महेश बाबूला हाक मारतो. महेशला जरा लाजल्या सारखे वाटते. त्यानंतर अनिल कपूर माईकवर बोलतो की,'ही माझी ऑर्डर आहे. तू ये.' अनिल कपूरच्या या विनंतीवर महेश बाबू स्टेजवर पोहोचतो.

महेश बाबू स्टेजवर पोहोचतो आणि आजूबाजूला पाहतो. अनिल कपूर नाचू लागतो आणि महेशलाही नाचायला सांगतो. पण महेश बाबू अनिल कपूरला मिठी मारतो आणि स्टेजवरून खाली जातो. अनिल कपूर आणि महेश बाबू यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर महेश बाबूचे चाहते चांगलेच संतापले आहेत. ते सोशल मीडियावर अनिल कपूरला ट्रोल करत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल होताच अनिल कपूरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. एका यूजरने लिहिले की,'आता तुम्हाला समजेल की थलापती जवानच्या कार्यक्रमात का आला नाही.' दरम्यान, रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT