Welcome To The Jungle Shooting Started Saam Tv
मनोरंजन बातम्या

Welcome 3: लारा दत्ताने 'वेलकम 3'च्या सेटवर अर्शद वारसी आणि अक्षय कुमारला चाबूकाने मारले, VIDEO होतोय व्हायरल

Welcome To The Jungle Shooting Started: 'वेलकम 3' चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत लारा दत्ता, अर्शद वारसी, कृष्णा अभिषेक, तुषार कपूर आणि अनेक कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये २-४ नाही तर २५ कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहे.

Priya More

Welcome 3 BTS Video:

बॉलीवूडचा (Bollywood) 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आगमी 'वेलकम 3 ' (Welcome 3 Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. अक्षय कुमार नेहमी आपल्या अ‍ॅक्शनसोबतच कॉमेडी चित्रपटांद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. अक्षय कुमार सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

'वेलकम 3' चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत लारा दत्ता, अर्शद वारसी, कृष्णा अभिषेक, तुषार कपूर आणि अनेक कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये २-४ नाही तर २५ कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहे. त्यामुळे शूटिंग सुरू होताच या चित्रपटाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अक्षय कुमारचा 'वेलकम 3' हा चित्रपट 'वेलकम' आणि 'वेलकम बॅक' चित्रपटांप्रमाणे कॉमेडीने भरलेला असेल. यावेळी देखील हे कलाकार प्रेक्षकांना खळखळवून हसवणार यात शंका नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशातच 'वेलकम टू द जंगल'च्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. जो पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. अक्षय कुमारने स्वत: आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर वेलकम टू द जंगलच्या सेटवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो लारा दत्ता, अर्शद वारसी, कृष्णा अभिषेक, तुषार कपूर आणि इतर कलाकारांसोबत दिसत आहे.

व्हिडीओमध्ये सर्व स्टार शूटिंग करताना दिसत आहेत. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी एका ट्रॅकवर चालण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशामध्ये लारा दत्त या दोघांना देखील चाबूकाने मारू लागते. त्यामुळे अक्षय कुमारचा तोल जातो आणि तो खाली पडतो. व्हिडीओमध्ये लारा दत्ता या दोघांना देखील ओरडताना दिसत आहे. अर्शद वारसीचा देखील अभिनय जबरदस्त आहे. शूटिंगदरम्यानची त्यांची मजा-मस्ती चाहत्यांना प्रचंड आवडली.

हा व्हिडिओ शेअर करत अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की,'मजेदार आणि विलक्षण गोष्टींनी भरलेल्या या प्रवासासाठी आम्हाला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. वेलकम टू द जंगलचं शूटिंग सुरू होताच मस्तीचं वातावरण सुरू होतं.' अक्षय कुमारने हा व्हिडीओ शेअर करत #Welcom3 असा हॅशटॅग दिला आहे. अक्षय कुमारने शेअर केलेला 'वेलकम टू द जंगल'चा हा बीटीएस (BTS) व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत. फिरोज ए नाडियाडवाला या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर २० डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT