Akshay Kumar Travel In Metro Instagram
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar: अक्षय कुमारने मुंबई मेट्रोतून केला प्रवास, VIDEO पाहून तुम्हालाही ओळखणं होईल कठीण

Akshay Kumar Travel In Metro: नुकताच अक्षय कुमारने मुंबई मेट्रोतून प्रवास केला. त्याचा मेट्रो प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही त्याला ओळता येणं कठीण होईल.

Priya More

Akshay Kumar Viral Video:

बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमी आपल्या सुपरहिट चित्रपट, फिटनेसमुळे चर्चेत राहतो. बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारचे नाव घेतले जाते. सध्या अक्षय कुमार त्यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याने या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली.

नुकताच अक्षय कुमारने मुंबई मेट्रोतून प्रवास केला. त्याचा मेट्रो प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही त्याला ओळता येणं कठीण होईल. या प्रवासादरम्यान चित्रपट निर्माते दिनेश विजान देखील अक्षयसोबत दिसत आहेत.

अक्षय कुमार त्याच्या कूल स्टाइलसाठी खूप लोकप्रिय आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर पल्लव पालीवाल यांनी अक्षय कुमारचा एक लेटेस्ट व्हिडिओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय चेहऱ्यावर मास्क लावून मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. यादरम्यान अक्षयसोबत 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'चा निर्माता दिनेश विजानही ​​दिसत आहे.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अक्कीने आपला चेहरा अशा प्रकारे झाकून घेतला की चाहत्यांना त्याला ओळखता येणार नाही. अक्षयने ब्लॅक कलरची हुडी, ब्लू कलरची ट्रॅक पँट, डोक्यावर ब्लॅक कलरची कॅप आणि तोंडाला मास्क असा लूक केला आहे. अक्षयच्या या लूकने चाहत्यांचे मन जिंकले. अक्षयने मेट्रो प्रवास केला खरा पण त्याला कोणीच ओळखू शकले नाही. एवढा मोठा सुपरस्टार असून सुद्धा अक्षयला मेट्रोतून प्रवास करताना पाहून चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. अक्षय कुमारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याआधीही अक्षय अनेकदा मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसला आहे.

याआधी 2023 च्या सुरुवातीला 'सेल्फी' चित्रपटाचे प्रमोशन करताना अक्षय कुमारने इम्रान हाश्मीसोबत मुंबई मेट्रोने प्रवास केला होता. त्यावेळी त्याने ‘मैं खिलाडी तू अनारी’ या गाण्यावर चाहत्यांसोबत जोरदार डान्सही केला. आता समोर आलेल्या व्हिडीओवरून अक्षय कुमार भविष्यात निर्माता दिनेश विजान यांच्या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा जोर होऊ लागली आहे. अक्षय कुमार लवकरच 'बडे मियाँ छोटे मियाँ आणि वेलकम 3' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT