Bade Miyan Chote Miyan Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bade Miyan Chote Miyan: 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये पाहायला मिळणार रिअल अ‍ॅक्शन, अक्षय- टायगरने शेअर केला BTS VIDEO

Akshay Kumar And Tiger Shroff: नुकताच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या शूटिंगदरम्यानचा अक्षय आणि टायगरचा एक बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Priya More

Bade Miyan Chote Miyan Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan Movie) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. एकीकडे दोघांचेही चाहते चित्रपटाच्या रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे नुकताच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या शूटिंगदरम्यानचा अक्षय आणि टायगरचा एक बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ॲक्शन व्हिडिओ शेअर करून निर्मात्यांनी चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

2024 च्या रिअल ॲक्शन फिल्म 'बडे मियाँ छोटे मियाँ'चं काउंटडाऊन सुरू होताच निर्मात्यांनी 'मेकिंग ऑफ द रिअल ॲक्शन फिल्म' नावाचा पहिला अधिकृत BTS व्हिडिओ रिलीज केला आहे. अक्षय आणि टायगरचा व्हिडीओ शेअर करून निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक खास सरप्राइज दिलं आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचे अफलातून ऑक्टेन स्टंट पाहायला मिळत आहेत. टायगरने त्याचा सोशल मीडिया वर हा खास व्हिडिओ शेयर केला आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाच्या शूटिंगचा हा बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये दिले की, 'सीमांना धक्का देणाऱ्या विलक्षण कृती अनुभवाची ही वेळ आहे! पाहा पडद्यामागील खास क्षण.' अक्षय कुमारच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. या व्हिडीओला अवघ्या काही तासांमध्ये २ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

'बडे मियाँ छोटे मियाँ' हा अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. जफर, जॅकी भगनानी, वाशु भगनानी, दीपशिखा देशमुख आणि हिमांशू किशन मेहरा यांनी पूजा एंटरटेनमेंट आणि एएझेड फिल्म्सद्वारे याची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत सोनाक्षी सिन्हा आणि मानुषी छिल्लर हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. तर पृथ्वीराज सुकुमारन विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT