Shaitaan New Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaitaan New Poster: 'जब बात परिवार पर आए, तो...', अजय देवगणच्या 'शैतान'चे नवीन पोस्टर आऊट

Shaitaan Movie: अजय देवगण 'शैतान' या सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता प्रेक्षकांची उत्तुकता आणखी वाढण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाचे आणखी एक दमदार पोस्टर रिलीज केले आहे.

Priya More

Ajay Devgn Shaitaan Movie:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'शैतान'मुळे (Shaitaan Movie) चांगलाच चर्चेत आहे. अजय देवगण 'शैतान' या सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता प्रेक्षकांची उत्तुकता आणखी वाढण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाचे आणखी एक दमदार पोस्टर रिलीज केले आहे. अजय देवगणच्या नव्या लूकमधील हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'शैतान'च्या नव्या पोस्टरमध्ये अजय देवगण खूपच इंटिमेट लूकमध्ये दिसत आहे. अजय देवगणने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर शेअर केले आहे. अजय देवगणने हे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेव्हा विषय आपल्या कुटुंबाचा येतो, तेव्हा तो प्रत्येक सैतानाशी लढेल...' फोटोमध्ये अभिनेत्याच्या डोळ्यात सैतानाची भीती स्पष्टपणे दिसून येते आहे. अजयच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत.

'शैतान' हा एक सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये आर माधवन एका खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत लोकांना घाबरवताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या टीझरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता टीझरचा प्रत्येक सीन खूपच भीतीदायक आहे. विकास बहल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेला हा चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

'शैतान' चित्रपटाचा टीझर आधीच युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे अशामध्ये आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हे पोस्टर देखील चांगलेच व्हायरल होत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अजय देवगण फिल्म्स आणि पॅनोरमाच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर विकास बहलने 'शैतान' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जादूटोणा, सस्पेन्स आणि गडद जगावर आधारित हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT